नवी दिल्ली : वैष्णव देवी जाणाऱ्या भाविकांसाठी एक खुशखबर आहे. वैष्णव देवी मंदिर ते भैरव मंदिर रोपवे सेवा सुरु करण्यात आली आहे. सोमवारी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी रोपवे सेवेचा शुभारंभ केला आहे. रोपवे सुरु झाल्याने आता भाविकांना भैरव मंदिरला जाण्याचा मार्ग सोपा होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैष्णव देवीच्या दर्शनासाठी लाभ तेव्हाच होतो जेव्हा या मंदिरापासून जवळपास ३.५ किलोमीटर अंतरावर असलेल्या भैरव मंदिराचं दर्शन घेतलं जातं अशी भाविकांची श्रद्धा आहे. पण भैरव मंदिराला जाण्यासाठी सरळ चढाई करावी लागते. पण सरळ चढाई करावी लागत असल्याने भाविक वैष्णव देवी मंदिरावरुनच परत जातात.



पण आता वैष्णो देवी श्राइन बोर्डाने भैरव मंदिराकडे जाण्यासाठी रोपवे सेवा सुरु केला आहे. रविवारी याचं ट्रायल घेण्यात आलं. जवळपास ३ हजार भाविकांना भैरव मंदिरापर्यंत मोफत पोहोचवण्यात आलं.



३ मिनिटाचं भाडं १०० रुपये


रोपवेने ३.५ किलोमीटरचं अंतर फक्त ५ मिनिटात पार करता येतं. यामुळे एकीकडेचं भाडं १०० रुपये ठेवण्यात आलं आहे. यासाठी एक तिकीट काउंटर उभारण्यात आलं आहे. वैष्णव देवीची यात्रा २४ तास सुरु असते. पण रोपवे सेवा ही फक्त दिवसा सुरु असणार आहे. श्राइन बोर्डाने म्हटलं की, या सेवेमुळे एका दिवसाला ३ ते ४ हजार भाविक वैष्णव देवी ते भैरव मंदिरापर्यंत प्रवास करु करतील.