कोलकाता : रसगुल्ला हा अनेकांचा विक पॉईंट. नुसतं नाव जरी उच्चारलं तरी, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. अशा या रसगुल्ल्यावरून पश्चिम बंगाल आणि ओडिसा या दोन राज्यांत वाद सुरू होता. जो पश्चिम बंगालने जिंकला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लागलीच ही आनंदाची बातमी राज्याच्या नागरिकांनाही देऊन टाकली.


रसगुल्ल्याला मिळणार आंतरराष्ट्रीय ओळख


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेली अनेक वर्षे ओडीसा आणि पश्चिम बंगाल ही राज्ये 'रसगुल्ला कुणाचा?' या मुद्द्यावरून भांडत होती. वाद टीपेला पोहोचला होता. अखेर या वादावर मंगळवारी पडदा पडला. नैसर्गिक ओळख (GI)असा टॅग पश्चिम बंगालला मिळाला. GI टॅग मिळाल्यामुळे पश्चिम बंगालमधील रसगुल्ला उत्पादकांना मोठा फायदा मिळण्याची शक्यता वाढली आहे. कारण, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी रसगुल्ल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी इच्छूक आहेत. त्यासाठी त्या जोमाने प्रयत्नही करताना दिसत आहे.


ममतांनी व्यक्त केला आनंद


दरम्यान, रसगुल्ल्याचा GI पश्चिम मंगालला मिळाल्याबद्धल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आनंद व्यक्त केला आहे. ममतांनी हा आनंद ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. या ट्विटमध्ये त्या म्हणतात, 'सर्वांसाठीच एक आनंदाची बातमी आहे. पश्चिम बंगाललला रसगुल्ल्याचा GI टॅग मिळाला आहे. हा टॅग मिळाल्याबद्धल मला प्रचंड आनंद आणि अभिमान वाटत आहे.'



पश्चिम बंगालने मारली बाजी


दरम्यान, गेली अनेक वर्षे उडिसा आणि पश्चिम बंगालमध्ये रसगुल्ल्यावरून वाद सुरू होता. रसगुल्ला हा पदार्थ पहिल्यांदा आपल्या राज्यात निर्माण झाला. त्यामुळे त्यावर नैसर्गिक अधिकार हा पश्चिम बंगाललाच आहे. तर, उडीसानेही असाच दावा करत रसगुल्ल्यावर हक्क सांगितला होता.