प्रत्येकाच्या खिशात असाणाऱ्या Pen संदर्भात मोठी बातमी!
Rotomac Pen: पेन बनवणाऱ्या या कंपनीने तब्बल 750 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सीबीआयने ठेवला आहे. त्यामुळे कंपनीच्या अडचणींमध्ये मोठी भर पडली आहे.
Rotomac fraud case News: काही वर्षापूर्वी प्रत्येकाच्या खिशात असणारा Rotomac Pen कंपनी अडचणीत आली आहे. कानपूरस्थित रोटोमॅक ग्लोबल (Rotomac) आणि तिच्या संचालकांविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयने (CBI) बुधवारी 16 नोव्हेंबर रोजी इंडियन ओव्हरसीज बँकेच्या (Indian Overseas Bank) सांगण्यावर हा दाखव करण्यात आला आहे. एकूण 750.54 कोटी रुपयेच्या फसवणुकीचा गुन्हा रोटोमॅक कंपनीवर (Rotomac) करण्यात आला आहे.
एकेकाळी पेन उत्पादनात आघाडीवर असलेली आणि तितकीच लोकप्रिय ठरलेली रोटोमॅक ही कंपनी देखील सीबीआयच्या (CBI) कचाट्यात सापडली आहे. जवळपास 20 वर्षे बाजारामध्ये आपला दबदबा निर्माण करणाऱ्या रोटोमॅक कंपनीची सध्या आर्थिक घडी पूर्णत कोलमडली असून रोटोमॅक ग्लोबल (Rotomac) ही देशातील अग्रगण्य पेन उत्पादक (Pen Manufacturers) कंपनी आहे. या कंपनीकडे बँक ऑफ इंडियाच्या (Bank Of India) नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाचे सुमारे 2,919 कोटी रुपये थकीत आहेत. या थकबाकीमध्ये 23 टक्के हिस्सा इंडियन ओव्हरसीज बँकेचा (IOB) आहे. सीबीआयने कंपनी, तिचे संचालक साधना कोठारी आणि राहुल कोठारी यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 120-बी आणि 420 अनुवये फसवणुकीचा (Financial Fraud) गुन्हा दाखल केला आहे. या व्यतिरिक्त भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध तरतुदींनुसारचा ही समावेश केला आहे.
वाचा : India vs New Zealand मालिकेचा आनंद फक्त 'हेच' लोक घेऊ शकणार
आर्थिक गैरव्यवहाराचे हे प्रकरण इंडियन ओव्हरसीज बँकेशी संबंधित आहे. पेन (Pen) निर्मितीमधील अग्रेसर असलेल्या कंपनीने बँक ऑफ इंडियाच्या (Bank OF India) नेतृत्वाखालील एक दोन नव्हे तर सात बँकांचे कोट्यावधी रुपये थकवले आहेत. या बँकांचे एकूण 2919 कोटी थकवण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या रकमेमध्ये इंडियन ओव्हरसीज बँकेच्या पैशांचा 23 टक्के इतका हिस्सा आहे.
कागदपत्रांमधील फेरफार उघडकीस
पेन निर्मितीमधील अग्रेसर असलेल्या रोटोमॅक कंपनीने कागदपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार करून घोटाळा केल्याचे समोर आले आहे. घोटाळ्याचा संशय आल्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँकेने फॉरेन्सिक चाचणी केली. त्या चाचणीमध्ये कागदपत्रांतील फेरफार उजेडात आला. तसेच लेटर ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारांचाही कुठेही खुलासा करण्यात आला नसल्याचे समजते. या विविध अनियमितेतेमुळे रोटोमॅक कंपनी मोठ्या अडचणीत सापडली आहे.