रेल्वे भरती: ग्रुप डी पदासाठी परीक्षेची तारीख जाहीर
रेल्वे भरती परीक्षेच्या तारखा जाहीर
मुंबई : आरआरबी ग्रुप डीच्या परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. रेल्वे भरती बोर्डाच्या आरआरबी ग्रुप डीच्या परीक्षेला पुढच्या महिन्यात सुरुवात होणार आहे. कम्प्युटर बेस ही परीक्षा असणार आहे.
कधी सुरु होणार परीक्षा
आरआरबीच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. लेवल-1 जसे ट्रॅक मेंटेनर, असिस्टेंट पॉइंट मेन यासारख्या 63 हजार जागांसाठी कम्प्युटर बेस परीक्षा असणार आहे. ही परीक्षा 17 सप्टेंबर 2018 पासून सुरु होणार आहे. आरआरबीने म्हटलं की, प्रवेश पत्र, परीक्षेचं शहर, तारीख आणि वेळ परीक्षेच्या 10 दिवस आधी ऑनलाईन मिळणार आहे. rrbcdg.gov.in वर आरआरबीने याबाबत एक नोटिफिकेशन जारी केलं आहे.
परीक्षेच्या माध्यमातून निवड
पहिली परीक्षा - सीबीटी (कंप्यूटर बेस्ड टेस्ट)
दुसरी परीक्षा - पीईटी (फिजिकल एफिशियंसी टेस्ट)
75 मार्कांचा पेपर
कंप्यूटर बेस्ट टेस्टमध्ये उमेदवारांना 1 तासाचा वेळ दिला जाणार आहे. 75 मार्कांचा हा पेपर असणार आहे. खुल्या वर्गातील उमेदवारांना 40% मार्क्स, ओबीसीला 30%, एससीला 30% आणि एसटीला 25% मार्क्स मिळवणे आवश्यक आहे.
आरआरबीकडून रेल्वेच्या ग्रुप-सी जागेसाठीची भरती परीक्षा 4 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे.