नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराची तीन दिवसीय समन्वय बैठक उद्यापासून सुरू होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि संघाशी संबंधित तब्बल ४० संघटनांचे पदाधिकारी या बैठकीला हजर राहणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी, दत्तात्रेय होसबाळे, कृष्णा गोपाल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया आदींची उपस्थिती यावेळी असणार आहे.


वृंदावनच्या केशव धाममध्ये होणा-या या बैठकीत संघ परिवारातल्या विविध संघटनांच्या कामगिरीची आढावा घेतला जाणार आहे. केरळमध्ये संघ कार्यकर्त्यांवरील वाढते हल्ले, हरियाणात बाबा राम रहिमच्या अटकेनंतर उसळलेला हिंसाचार याबाबत यावेळी चर्चा होणार असल्याचं समजतंय.