गुरुवायूर  : केरळमधील गुरुवायूर येथील नेनमेनीमध्ये एका कथित माकप कार्यकर्त्यांनी रविवारी दुपारी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या एका कार्यकर्त्याची हत्या केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आनंदन (२३) सांगण्यात येत आहे. आनंदन हा आपल्या दुचाकीवर जात असताना कारमधून आलेल्या कथित माकप कार्यकर्त्यांनी त्याच्यावर हल्ला केला. त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याला वाचविण्यात यश आले नाही.


ब्रह्मकुलम येथे राहणारा आनंदन हा २०१३ मध्ये माकपच्या एका कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणातील आरोपी होता. भाजपने आरोप केला आहे, २००१ नंतर केरळमध्ये आतापर्यंत  १२० कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे. यात ८४ जण हे केवळ कन्नूर येथील असल्याचा दावा भाजपने केलाय.



दरम्यान, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची सत्ता आल्यानंतर १४ लोकांची हत्या झाल्याचा आरोप भाजपने केलाय. तर माकपाने हिंसा भडकविण्याचा भाजप आणि आरएसएसवर आरोप केलाय. मात्र, हत्याचा आरोप माकपाने फेटाळून लावला आहे.


पोलीस सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी आनंदन आपल्या बाईकने घरी जात होता. त्यावेळी कारमधील काही लोकांनी आनंदनवर हल्ला केला. त्याता तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणात काही माकपा कार्यकर्त्यांचा हात असल्याचे म्हटलेय. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मोर्चा काढून या घटनेचा धिक्कार केला.