श्रीनगर : एक देश एक कर हे सूत्र घेऊन, देशभरात गुड्स अँड सर्विस टॅक्स म्हणजेच जीएसटी लागू झाला. मात्र जम्मू काश्मीर राज्यात अजून जीएसटी लागू झालेलं नाही. यासंबंधी जम्मू काश्मीर विधीमंडळाचं अधिवेशन बोलावण्यात आलं. मात्र या अधिवेशनात जीएसटीच्या मुद्द्यावर सभागृहात कमालीचा गदारोळ माजला.


जम्मू काश्मीरमध्ये जीएसटी लागू करायला विरोधी पक्षांच्या आमदारांनी विरोध केला. त्यामुळे आक्रमक झालेल्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विरोधी पक्षाच्या आमदारांचा निषेध केला. परिणामी सभागृहात एकच गोंधळ उडाला.