नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक फूट पाडली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला. ते शनिवारी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, पाकिस्तानात आपण गेल्यावर तेथील लोक आपल्याशी बंधुभावाने वागतात, असा माझा अनुभव आहे. एवढेच नव्हे तर ते लोक भारतामधील आपल्या नातेवाईकांना कधीच भेटू शकत नाहीत. त्यामुळे ते प्रत्येक भारतीयाला आपला नातेवाईक समजतात, असे पवारांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानामध्ये अन्याय आणि असंतोषाचे वातावरण असल्याची चर्चा आपल्याकडे होते. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. केवळ राजकीय फायद्यासाठी पाकिस्तानमधील खरी परिस्थिती समजवून न घेता अफवा पसरवल्या जात आहेत. सत्ताधारी पक्ष या माध्यमातून आपले राजकारण साधून पाहत आहे, असेही पवारांनी यावेळी सांगितले. 


पाकिस्तानला युद्ध नको असेल तर पाकव्याप्त काश्मीर भारताला द्यावा- रामदास आठवले


जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. या मुद्द्यावरून पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताविरोधी रान उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाकिस्तानचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. 



भारत केवळ अनुच्छेद ३७० हटवून थांबणार नाही. पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसखोरी करणे, हा भारताचा पुढचा अजेंडा असल्याचा आरोपही पाकिस्तानमधील अनेक मंत्र्यांनी केला होता. या सगळ्यामुळे युद्ध झाल्यास पाकिस्तानही त्याला चोख प्रत्युत्तर देईल, अशी दर्पोक्तीही पाकिस्तानमधील अनेक नेत्यांनी केली आहे. 


...तर कोणतीही ताकद पाकिस्तानला तुकडे होण्यापासून वाचवू शकत नाही- राजनाथ सिंह