Rupee Bank ठेवीदारांसाठी महत्त्वाची बातमी ,लवकर करा हे काम अन्यथा पैशांचे व्यवहार करणं होईल अवघड
रुपी सहकारी बॅंकेतील ठेवीदार, खातेदारांनी त्यांच्या पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत मिळण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत केवायसीसह अर्ज करावेत अशी माहिती अवसायक धनंजय डोईफोडे यांनी दिली आहे.
Bank News : केंद्र सरकारने (central Government) अडचणीतील बॅंकांच्या ठेवीदारांना पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत करण्यासाठी सुधारित ठेव विमा कायदा मंजूर केला आहे. त्यानुसार रुपी बँकेलाही (rupee bank) ठेवीदारांना पाच लाखापर्यंतच्या ठेवी परत कराव्या लागणार आहेत. दरम्यान रुपी सहकारी बॅंकेतील ठेवीदार, खातेदारांनी त्यांच्या पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत मिळण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत केवायसीसह अर्ज करावेत अशी माहिती अवसायक धनंजय डोईफोडे यांनी दिली आहे. पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत घेण्यासाठी अजूनही अर्ज न केलेल्या ठेवीदार, खातेदारांनी संबंधित शाखेशी संपर्क साधावा. योग्य कागदपत्रांसह बँकेच्या कोणत्याही शाखेत 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करावे असं आवाहन करण्यात आलंय. या मुदतीत अर्ज न केल्यास ठेवींची रक्कम मिळण्यास अडचण आली तर बँक जबाबदार राहणार नाही असे देखील सांगण्यात आले आहे.
रुपी बँक गेल्या 1 नोव्हेंबरपासून अवसायनात आली असून धनंजय डोईफोडे यांनी अवसायक पदाचा पदभार स्वीकारला आहे. अवसायनाच्या प्रक्रियेनुसार ठेव विमा महामंडळातर्फे ज्या ठेवीदारांना यापूर्वी बँकेकडून पाच लाखांपर्यंतची विमा संरक्षित ठेव रक्कम मिळालेली नाही, अशा ठेवीदारांना अर्ज देण्याबाबत यापूर्वी आवाहन करण्यात आले होते.
वाचा: श्रध्दाची 'ती' महत्त्वाची गोष्ट मिळवण्यासाठी वडिलांची धडपड
तसेच पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत घेण्यासाठी अद्याप अर्ज न केलेल्या ठेवीदार, खातेदार यांनी संबंधित शाखेशी त्वरित संपर्क करावा. ठेवीदारांनी आवश्यक पूर्तता करुन योग्य कागदपत्रांसह बँकेच्या कोणत्याही शाखेत 31 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत. अन्यथा रुपी बँक जबाबदार राहणार नाही, असे आवाहन रुपी बँकेतर्फे करण्यात आले आहे.