आतापर्यंत 35, रशिया-उक्रेन युद्धात भारतीय नागरिकांची तस्करी...अशी होतेय फसवणूक
Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धात भारतीय नागरिकांच्या मृत्यच्या बातम्या समोर येत आहेत. या युद्धात आतापर्यंत भारताच्या दोन तरुणांनी जीव गमावला आहे. या दोन्ही तरुणांना फसवणू रशियन सैन्यात दाखल केल्याचा दावा मृत तरुणांच्या कुटुंबियांनी केला आहे.
Russia-Ukraine War : गलेलठ्ठ पगार आणि आकर्षक जीवनशैली असलेली नोकरी... अशी आमिषं दाखवून भारतीय तरुणांना रशिया-युक्रेन युद्धात ढकललं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक भारतीय तरुणांना (Indians) आपल्याला रशियात युद्धात (War) पाठवलं जाणार असल्याचं माहित नव्हतं. रशियात पोहोचल्यानंतर त्यांच्याकडून एका करारावर (Contract) स्वाक्षरी घेण्यात येते. हा करार रशियन भाषेत असतो. या करारात रशियन सैन्याबरोबर मदतनीस म्हणून काम करत असल्याचं नमुद केलेलं असतं, शिवाय दर महिन्याला 2 लाखांचा पगार दिला जाईल असंही त्यांना सांगितलं जातं.
सीबीआयची कारवाई
भारतीय तरुणांना नोकरीच्या बहाण्याने रशियात पाठवण्याचं एक मोठं रॅकेटच कार्यरत आहे. आता सीबीआयने या रॅकेटविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे. 7 मार्चला सीबीआयने मुंबई, दिल्ली, तिरुवनंतपुरम, अंबाला, चंदागड, मदुराई आणि चेन्नई या तेरा ठिकाणी छापेमारी केली. सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 35 तरुणांना फसवून रशियात पाठवण्यात आलं आहेत. ओळखीच्या किंवा एजंटच्या माध्यमातून चांगल्या पगाराच्या नोकरीचं आमिष दाखवत या तरुणांना फसवलं जातंय.
दोन भारतीयांचा मृत्यू
रशिया-युक्रेन युद्धात आतापर्यंत दोन भारतीयांचा मृत्य्यू झाला आहे. यात एक तरुण गुजरातमधल्या सूरत इथला तर दुसरा तरुण तेलंगणातल्या हैदराबाद इथे राहाणारा होता. सूरतमध्ये राहाणाऱ्या तरुणाचं नाव हेमिल अश्विनभाई मंगूकिया असं आहे. युक्रेनविरुद्ध लढताना त्याचा मृत्यू झाला. युक्रेनने केलेल्या एका मिसाईल अटॅकमध्ये हेमिलचा मृत्यू झाल्याचा दावा केला जातोय. 23 वर्षांचा हेमिक रशियन सैन्यात मदतनीस म्हणून सहभागी झाला होता. त्याला 50 हजार रुपये महिना पगार दिला जात होता. हेमिलचं 20 फेब्रुवारीला शेवटचं आपल्या कुटुंबियांशी बोलणं झालं होतं.
सूरत, चेन्नई ते मॉस्को
हेमिलच्या मावसभावने दिलेल्या माहितीनुसार रशियाला जाण्यासाठी हेमिलने एका एजंटला 3 लाख रुपये दिले होते. रशियात त्याला महिना 50 हजार रुपयांची नोकरी मिळाली होती. पण रशियात पोहोचल्यावर हेमिलकडून एका करारावार स्वाक्षरी घेण्यात आली. यात युद्धात सहभागी होत असल्याचं लिहिण्यात आलं होतं. हेमिलने एका ऑनलाईन जाहीरातीत रशियातील नोकरीबाबद वाचलं होतं, त्यानंतर त्याने दिलेल्या पत्त्त्यावर अर्ज केला. यानतंर हेमिलला सूरतवरुन चेन्नई आणि तिथून थेट मॉस्कोला पाठवण्यात आलं.
हैदरबादच्या तरुणाचीही फसवणूक
दुसऱ्या प्रकरणात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव मोहम्मद असफान असं आहे. असफानचा भाऊ इमरानने दिलेल्या माहितीनुसार असफान 9 नोब्हेबरला युट्यूब चॅनेल असलेल्या बाबा व्लॉगच्या माध्यमातून रशियाला गेला. तो रमेश, नाजिल, मोइन आणि खुशप्रीत या एजेंटच्या संपर्कात होता. रमेश आणि नाजिल चेन्नईचे आहेत. तर खुशप्रीत हा पंजाबचा आहे. खुशप्रीतनेच रशियात असफानला गोळी लागल्याची माहिती इमरानला दिली. इमरान यांनी खासदार असुद्दीन ओवेसी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी रशियातल्या भारतीय दूतावासात फोन केला. तिथे युद्धात असफानचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यता आली.
पंजाबमधल्या तरुणांचा व्हिडिओ
या केवळ दोनच घटना नाहीएत. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. रशियात अडकलेल्या सात भारतीय तरुणांचा हा व्हिडिओ होता. यातले पाच जण पंजाबचे तर दोन जण हरियाणात राहाणारे आहेत. व्हिडिओत या सातही तरुणांच्या अंगावर रशियन सैन्याचे कपडे आहेत. हे सर्व तरुण नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी रशियात गेले होते. तिथे त्यांना एक एजंट भेटला. तो त्यांना घेऊन बेलारूसला गेला. बेलारुपमध्ये पोलिसांनी या तरुणांना अटक करत रशियन आर्मीच्या ताब्यात दिलं.
रशियन सैन्याने केला करार
व्हिडिओत या तरुणांनी रशियन सैन्याने आपल्याकडून एका करारावर जबरदस्तीने स्वाक्षरी करुन घेतल्याचं सांगितलं. रशियन सैन्यात हेल्परची नोकरी करा, किंवा 10 वर्षांचा तुरुंगवास भोगा अशी अट त्यांच्यासमोर ठेवण्यात आली. या तरुणांकडे मायदेशी परतण्याचा काहीच पर्याय नव्हता. त्यामुळे त्यांना नाईलाजास्तव करारावर सही करावी लागली. या तरुणांना शस्त्र हाताळण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. या तरुणांनाबरोबर आणखी काही तरुण होते. या सर्वांना युद्धात फ्रंटालाईनला पाठवण्यात आलं. हे तरुण सांगतात, आम्हाला धड बंदूकही धरता येत नव्हती आणि आम्हाला सर्वात पुढे ठेवलं गेलं. रशियात अडकलेले तरुणहे उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा राज्यातले आहेत.
कोण आहे तो यु्ट्यूबर
वास्तविक ज्या बाबा व्लॉगच्या माध्यमातून असफान रशियात गेला. तो एक यूट्युबर आहे. हा व्यक्ती व्हिडिओद्वारे परदेशात नोकरी देण्याचं आश्वासन देतो. त्याबदल्यात तो भरपूर पैसा कमावतो. आतापर्यंत त्याने आपल्या युट्यूब चॅनेलवर 148 व्हिडिओ शेअर केले असून त्याचे 3 लाख फॉलोअर्स आहेत. फेसबूक आणि इन्स्टाग्रामवर तो आपले व्हिडिओ शेअर करत असतो.