RVNL Job: रेल्वेमध्ये चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. भारतीय रेल्वेअंतर्गत येणाऱ्या रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. मुख्य म्हणजे थेट मुलाखतीतून उमेदवारांची निवड होणार असून यासाठी अवघे 2 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे तुम्ही या भरतीसाठी इच्छुक असाल आणि अजूनही अर्ज केला नसेल तर तुम्हाला घाई करावी लागेल.


पदांचा तपशील


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत अनेक पदे रिक्त आहेत. या जागांवर पात्र उमेदवारांची भरती केली जाईल. आरव्हीएनएल अंतर्गत प्रकल्प व्यवस्थापक, सर्वेक्षक, प्लंबिंग अभियंता, प्रकल्प व्यवस्थापन अभियंता, संपर्क अधिकारी, नियोजन व्यवस्थापक, स्टोअर व्यवस्थापक, लेखा व्यवस्थापक, वरिष्ठ SHE व्यवस्थापक ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत वर नमूद केलेल्या पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.


आरव्हीएनएल भरती अंतर्गत उमेदवारांची कोणती परीक्षा घेतली जाणार नाही. तर थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे मुलाखतीत मिळालेल्या गुणांवर तुम्हाला नोकरी मिळणार की नाही हे ठरणार आहे. उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. मुलाखतीला उपस्थित राहणारा उमेदवार हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत असावा. कॉर्पोरेशन पॉलिसीनुसार उमेदवाराला वैद्यकीय चाचणीला सामोरे जावे लागू शकते, हे लक्षात ठेवा. 1 मार्च 2024 रोजी उमेदवाराचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे. गुणवत्ता, पात्रता आणि अनुभव याच्या आधारे उमेदवाराची निवड केली जाणार आहे. 


BMC Bharti:मुंबई पालिकेअंतर्गत बारावी, पदवीधरांना नोकरीची संधी


मुलाखतीचा पत्ता


1 आणि 2 एप्रिल 2024 रोजी उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे. उमेदवारांनी आपल्या आवश्यक कागदपत्रांसह अहारिका, तळमजला, रेल विकास निगम लिमिटेड, ऑगस्ट क्रांती भवन, भिकाजी कामा प्लेस, आर.के. पुरम, नवी दिल्ली-110066 या पत्त्यावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. सकाळी 11 वाजता मुलाखतीस सुरुवात होईल. उमेदवाराने त्याआधी मुलाखत स्थळी हजर राहणे आवश्यक आहे. मुलाखत संपल्यानंतर आलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार नाही, याची नोंद घ्या.


अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा


पिंपरी-चिंचवड शहरात मोठी पोलीस भरती! इच्छुकांनी 'येथे' पाठवा अर्ज