Saas Bahu Aur Flamingo Trailer: सध्या जमाना आहे तो म्हणजे ओटीटीचा. तेव्हा या प्लॅटफॉर्मवर मोठं मोठे सेलिब्रेटीही (Bollywood Celebs on OTT) आपल्या अभिनयाची चांगलीच चुरस दाखवता दिसत आहेत.  अगदी अभिषेक बच्चनपासून सुष्मिता सेन, विद्या बालन, लारा दत्ता, नसिरूद्दिन शहा यांसारखे तगडे सिनेसृष्टीतील कलाकारही मोठ्या प्रमाणात ओटीटीवर लोकप्रिय होताना दिसत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे ओटीटीवरील चित्रपटानंतर किंवा वेबसिरिजनंतर या कलाकारांची चर्चा होयला फारसा वेळ लागत नाही. सध्या या (Dimple Kapadia New Look) कलाकारांच्या यादीत उडी घातली आहे ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडिया हिनं. (saas bahu aur flamingo trailer released actress dimple kapadia wins fans heart with her stunning look)


आपण आत्तापर्यंत डिंपल कपाडिया हिला नानाविध भुमिकांमधून पाहिले आहे. कधी रोमॅण्टिक तर कधी गंभीर अशा भुमिकांमधून डिंपल कपाडिया प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 70 आणि 80 चे दशक डिंपल कपाडियानं अक्षरक्ष: गाजवलं आहे. त्यामुळे त्याकाळचे ते रोमॅण्टिक चित्रपट आठवले की त्यात डिंपल कपाडियाचा हटके परफॉर्मन्स आपल्या लक्षात येताच. परंतु आता जमाना ओटीटीचा आहे आणि वेगळा अभिनय प्रेक्षकांना रूचत असून आता हे कलाकारही या ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधार घेताना दिसत आहेत. 


डिंपल कपाडियाचा सास, बहू और फ्लेमिंगो (Saas Bahu Aur Flamingo Trailer) ही नवी सिरिज प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. यामध्ये डिंपल कपाडिया एका वेगळ्या लुकमध्ये दिसत आहे. हातात बंदूक, खुन, मारामारी आणि हिंसा अशी या ट्रेलरची पार्श्वभुमी दिसत असली तरी या सिरिजमध्ये डिंपल कपाडियाचा आतापर्यंत कधीही न पाहिलेला लुक प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. तेव्हा हा ट्रेलर पाहून डिंपल कपाडिया यांचे चाहतेही खूप उत्सुक झालेले आहे. 


काय आहे ट्रेलरमध्ये खास? 


या ट्रेलरच्या बॅकरांऊडला क्योंकि सास भी कभी बहू थी हे टायटल सॉन्ग ऐकायला मिळते आहे. त्यामध्ये राजकारण, राजेशाही, गुन्हेगारी, हिंसा आणि मसाल्याचा मामला पाहायला मिळतो आहे. ही सिरिज 5 मेला हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. 'मॅडडॉक फिल्म्स'च्या ऑफिशियल इन्टाग्रामवरून या सिरिजचा ट्रेलर शेअर केला आहे.  


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


डिंपल कपाडिया यांचा नुकताच 'तू झूठी मैं मक्कर' (Tu Zhooti Mein Makkar Dimple Kapadia) हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता. ज्यात डिंपल कपाडिया यांच्या भुमिकेचेही प्रचंड कौतुक झाले होते. या सिरिजमधून राधिका मदनही दिसते आहे.