मुंबई: केरळमधील शबरीमला येथे असणारे अय्यप्पा मंदिर बुधवारी मासिक पूजेसाठी खुले होणार आहे. सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या ऐतिहासिक निर्णयानंतर हे मंदिर पहिल्यांदाच खुलं होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐतिहासिक निर्णानंतर मंदिर खुले होण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच मंगळवारी निलक्कल येथे तणावाचं वातावरण पाहायला मिळालं होतं. पण, भाविकांना मंदिरात प्रवेश करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असं केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी स्पष्ट केले आहे. 


एकिककडे मंदिरात प्रवेश मिळणार असल्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, पण, दुसरीकडे मात्र काही महिला वर्गाकडून अद्यापही या निर्णयाचा विरोध करण्यात येत असून, मंदिरात जाण्याऱ्या १० ते ५० वयोगटातील महिलांना रोखण्यात येत आहे. 


सदर वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश मिळाल्य़ास सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा काही भाविकांनी दिला आहे. 


शबरीमला येथे एका महिन्याभरासाठी चालणाऱ्य़ा यात्रेसाठीच्या पूजेची सुरुवात ही राजघराण्यापासून होते. पण, सर्वोच्च न्यायालयातच्या निर्णयानंतर मात्पर बुधवारी मंदिरात पूजारी येण्याची चिन्हं धुसर असल्याचं कळत आहे. 


सर्व वयोगटातील महगिलांसाठी शबरीमलाच्या मंगदिराचे द्वार खुले करण्याच्या निर्णयाचे काही स्तरांतून स्वागत करण्यात आले. पण, काही संघटनानंनी मात्र अद्यापही या निर्णयाचा विरोध करणं सुरुचत ठेवलं आहे. 


निर्णयाला होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर खुद्द मुख्यमंत्री पी. विजयन .या प्रकरणात लक्ष घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. 


केरळ राज्य शासनातर्फे सर्वोच्च नायालयाच्या निर्णयाला आवाहन देणारी कोणतीही पुनरावलोकन याचिका दाखल करण्यात येणार नसल्याचं त्यांनी फार आधीच स्पष्ट केलं होतं. 


मासिक पूजेसाठी मंदिर खुले होण्याच्या पार्श्वभूमिवर कोणत्याची प्रकारचा लिंगभेद येथे केला जाणार नसल्याची ठाम भूमिकाही त्यांनी मांडली. 


विजयन यांची भूमिका आणि एकंदर केरळमध्ये बिघडणारे वातावरण, तीव्र होणारे आंदोलन पाहता शबरीमलाची पूजा निर्विघ्न पार पडणार का, याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.