नवी दिल्ली : राज्यसभा सदस्य सचिन तेंडुलकर गुरूवारी संसदेच्या कारवाईत, भाग घेण्यासाठी जेव्हा पोहोचले, जेव्हा त्यांची बोलण्याची वेळ आली, तेव्हा विरोधीपक्षाद्वारे गोंधळ सुरू होता, त्यामुळे सचिन तेंडुलकर यांना बोलता आलं नाही.


मनमोहन सिंहांविरोधातील वक्तव्यावर माफीची मागणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरोधीपक्षाकडून मनमोहनसिंह यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यावर, पीएम नरेंद्र मोदी यांनी माफी मागण्याची मागणी केली जात आहे. नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, या मागणीसाठी राज्यसभेत गोंधळ सुरूच होता.


सचिन तेंडुलकर संसदेत दाखल...पण


माजी क्रिकेटर आणि राज्यसभेचे खासदार सचिन तेंडुलकर गुरूवारी संसदेच्या कार्यवाहीत भाग घेण्यासाठी संसदेत दाखल झाले होते. 


पण सचिन का बोलू शकला नाही...


अजेंड्यानुसार त्यांना आपले काही मुद्दे संसदेत मांडायचे होते, मात्र सचिन तेंडुलकर जेव्हा बोलायला उभे राहिले. मात्र सचिन बोलायला उभा राहिला आणि संसदेत विरोधी पक्षाचा गोंधळ देखील वाढल्याने सचिन बोलू शकला नाही.


विरोधीपक्ष न थांबल्यामुळे गोंधळ सुरूच


या दरम्यान, सभापती विरोधी पक्षाच्या खासदारांना सतत विनंती करत होते की, शांत बसा, पण सचिन या गोंधळात बोलू शकला नाही. विरोधीपक्ष येथेच थांबला नाही, त्यामुळे राज्यसभेचं कामकाज उद्या सकाळी 11 पर्यंत स्थगित करण्यात आलं.


जया बच्चन यांची प्रतिक्रिया


राज्यसभा सदस्य जया बच्चन यांनी संसदेत पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, सचिन तेंडुलकरने जगभरात भारताचं नाव आणि उज्ज्वल केलं, पण त्यांना संसदेत बोलू न देणे, हे लाजीरवाणं आहे.