नवी दिल्ली : क्रिकेटच्या मैदानात गोलंदाजांना सळो कि पळो करुन सोडणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने संसदेच्या क्रिझवर बरेच दिवसांनी पाऊल ठेवले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेटमध्ये जोरदार बॅटींग करणाऱ्या सचिनला खासदार सचिन तेंडुलकर झाल्यावर आपल्या कार्याची चुणूक पाहिजे तशी दाखविता आली नाही. त्यामुळे बरीच मंडळी सचिनवर नाराज असल्याचे पाहायला मिळत होती. त्यात खासदार बनल्यानंतर सचिनने 348 दिवसांत केवळ 23 दिवसच हजेरी लावली आहे. ज्याची संसदेतील मंडळी चातकाप्रमाणे वाट पाहत होती तो सचिन अखेर गुरुवारी राज्यसभेत हजर राहिला. पण यावेळेस हायला सचिन ! किंवा सचिन, सचिन असे उद्गार न ऐकायला मिळता सचिनची खिल्ली उडविलेलीच जास्त पाहायला मिळाली. सचिनच्या उपस्थितीची ‘सोशल मीडिया’करांनी जास्त मज्जा घेत ‘ट्रोल’ केले गेले.


याआधी मंगळवारी राज्यसभेत गैरहजर असलेल्या खासदारांच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा झाली. सोशल मीडियावर असणाऱ्यांच्या नजरेतून हे ‘सचिन हजेरी प्रकरण’ सुटलेले नाही. या अधिवेशनात सचिन पहिल्यांदाच दिसला आहे. त्यामुळे फेसबुक ,ट्वीटरवर युजर्स कालपासून सचिनची खिल्ली उडवत आहेत. कोणी म्हणतं, कोणत्या तरी नव्या जाहिरातीसाठी सचिनचे दिल्लीत जाणे झाले असेल. तर काही म्हणतात, आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी सचिनने राज्यसभेची निवड केली आहे. आता तर अच्छे दिन येतीलच अशा आशयाच्या ट्वीटही काहींनी केल्या आहेत.




सचिनचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी


दरम्यान समाजवादी पार्टीचे खासदार नरेश अग्रवाल यांनी सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री रेखा यांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. २०१२ मध्ये राज्यसभा खासदार झाल्यानंतर ३४८ दिवसात सचिनने २३ तर रेखाने १८ दिवस राज्यसभेत हजेरी लावली.  त्यामुळे विजय माल्ल्याप्रमाणे यांचे सदस्यपदही रद्द करण्यात यावे असे खा. अग्रवाल म्हणाले.