Shocking News : निष्काळजीपणामुळे अशा धक्कादायक घटना घडत असतात की एखाद्यावेळेत व्यक्तीच्या जीवावर बेतू शकते. असाच एक धक्कादायक प्रकार हरयाणा येथे राहणाऱ्या 13 वर्षाच्या मुलीसह घडला आहे. अचानक खोकल्याचा त्रास सुरु झाला म्हणून ही मुलगी डॉक्टरकडे गेली. सर्व वैदकीय तपासण्या केल्यानंतर या मुलीचा  CT स्कॅन रिपोर्ट पाहून डॉक्टर हादरले. त्वरीत उपचार झाल्याने या मुलीचा जीव वाचला आहे.  हरियाणातील(Haryana) रोहतग येथील  पल्मोनरी आणि क्रिटिकल केअर मेडिसिन विभागाच्या डॉक्टरांनी या मुलीवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. तब्बल तीन तास ही शस्त्रक्रिया सुरु होती. अचानक खोकल्याचा त्रास सुरु झाल्याने ही मुलगी डॉक्टरांकडे गेली असता धक्कादायक माहिती समोर आली.


नेमकं काय झालं होत या मुलीला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन महिन्यांपूर्वी या 13 वर्षांच्या मुलीने चुकून सेफ्टी पीन गिळली होती. श्वासाद्वारे ही पिन तिच्या फुफ्फुसात गेली होती. यामुळे मुलीला खोकल्याचा त्रास सुरु झाला. ही पीन मुलीच्या फुफ्फुसात खोलवर रुतली गेली होती.
पीन फुफ्फुसात अडकल्यामुळे या मुलीच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागली होती. 


पीन फुफ्फुसात अडकल्याने ऑक्सिजनची पातळी कमी झाली


सुरुवातीला या मुलीला खोकल्याचा त्रास झाला.  तसेच वरचेवर तापासह तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी त्यांच्या प्राथमिक तपासणीत मुलीची ऑक्सिजन पातळी खूपच कमी होत असल्याचे आढळून आल्याने तिला सतत खोकल्याचा त्रास सुरु झाला.  


पीनवर मांसाचा थर जमा झाला


ही पीनमुळे मुलीच्या फुफ्फुसामध्ये मांसाचा थर जमा झाला. यामुळे प्रकृती आणखी बिघडली होती. सुरुवातीला डॉक्टरांनी ब्रॉन्कोस्कोपीद्वारे पिन काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलीची ऑक्सीजन पातळी एदमक खालावली. अखेरीस डॉक्टरांनी या मुलीवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या मुलीला बेशुद्ध करुन तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तब्बल 3 तास या मुलीवर शस्त्रक्रिया सुरु होती. तब्बल दोन दिवस ही मुलगी व्हेंटिलेटरवर होती. अखेरीस ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून या मुलीचे प्राण वाचले. 


उपचारानंतर या मुलीला रुग्णालायतून घरी सोडण्यात आले. या मुलीच्या प्रकृतीत हळू हळू सुधारणा होत आहे. चिकून सेफ्टी पिन गिळल्याचे या मुलीने सांगितले. पीन गिळल्यानंतर मुलीने घरात कुणालाही याबाबत काहीच सांगितले नाही. अचानक त्रास सुरु झाल्यानंतर मुलीने घरच्यांना सांगितले. तपासणीदरम्यान या मुलीने सेफ्टी पीन गिळल्याची धक्कादायक माहिती समोर आली.