नवऱ्याला घोड्यावर चढता आले नाही म्हणून नवरीचा लग्नाला नकार, नक्की काय आहे हे प्रकरण?
ही घटना सदर बाजारातील एका मॅरेज लॉनची आहे.
शाहजहांपूर : लग्न म्हणजे मजा मस्करी हे सगळं तर येतातच. लग्नात लोकं एकमेकांची खिल्ली देखील उडवतात. हा दिवस नवरा नवरीसाठी खूप महत्वाचा असतो. प्रत्येक मुलगी तर तिच्या आयुष्यातील याच दिवसाची आतुरतेने वाट पाहात असते. परंतु यूपीच्या शाहजहांपूर येथे एका लग्नात असे काही घडले की, ज्यामुळे या वधूने दारात आलेल्या नवऱ्याला परवून लावले आणि आपले लग्न मोडले?
ही घटना सदर बाजारातील एका मॅरेज लॉनची आहे. गुरुवारी एका विवाह सोहळ्यादरम्यान नवऱ्यामुलाने इतके मद्यपान केले होते की, त्याला घोड़्यावर चढणे अशक्य झाले. बर्याचदा प्रयत्न करूनही जेव्हा त्याला घोड्यावर चढता आले नाही. तेव्हा मग वधूने त्या मुलासोबत लग्न करण्यास नकार दिला.
वधूने सांगितले की, "जो व्यक्ती लग्नाच्या दिवशी इतकी दारू प्यायला आहे की, त्याला त्या नशेत घोड्यावर देखील चढता येत नाही. अशा माणसासोबत लग्न करुन मला माझे आयुष्य खराब नाही करायचे. त्यामुळे माझा या लग्नाला नकार आहे."
परंतु अनेक लोकांच्या विनंतीवरुन ती वधू पुन्हा लग्नाला तयार झाली. त्यानंतर दोघांनीही एकमेकांना हार घातला. पण ही गोष्ट वधूच्या मनात सतत बोचत होती. त्यामुळे अखेर तिने सात फेऱ्या घेण्यास नकार दिला. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी देखील तिच्या या निर्णयावर सहमती दर्शविली आणि हे लग्न मोडले.
वधूने लग्न मोडल्यानंतर या विषयावर दोन्ही कुटूंबामध्ये संपूर्ण रात्रभर बोलणी सुरू होता. त्यानंतर पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर दोन्ही पक्षांनी एकमेकांचे सामान परत केले. त्यानंतर वराला वधू शिवायच आपली वरात घरी न्यावी लागली.
पोलिस निरीक्षक अजय पाल यांनी सांगितले की, "वधूच्या बाजूने या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. दोन्ही बाजूंनी करार झाला आहे. या करारात ठरल्याप्रमाणे दोन्हीही कुटूंबीयांनी एकमेकांना दिलेला मुद्देमाल परत केला आहे."