मुंबई : सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेऊन देशाची सेवा करण्याच्या आणि अधिकारी होण्याचा विचार करणाऱ्या मुलींकरता सर्वात आनंदाची बातमी. संरक्षण मंत्रालयाने देशातील पाच सैनिक स्कूलमध्ये मुलींना देखील प्रवेश देण्यास परवानगी दिली आहे. देशभरात 5 सैनिक स्कूल असून आता मुलीदेखील यामध्ये प्रवेश घेऊ शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभरात चंद्रपूर (महाराष्ट्र), विजापूर (कर्नाटक), कोडागु (कर्नाटक), घोराला (उत्तराखंड), कालिकिरी (आंध्रप्रदेश) या राज्यात 5 सैनिक स्कूल आहे. या शाळेत प्रवेश घेण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून 6 डिसेंबर 2019 रोजी ही अंतिम तारीख आहे. याची प्रवेश परिक्षा 5 जानेवारी 2020 रोजी होणार आहे. ऑनलाईन प्रक्रियेकरता https://www.sainikschooladmission.in/index.html या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. 


सैनिक शाळेत सहाव्या इयत्तेत मुलींना प्रेवश दिला जाणार आहे. विद्यार्थ्यीनींच्या परिक्षेकरता 15 परिक्षा केंद्रासोबतच दोन अतिरिक्त परिक्षा केंद्र तयार करण्यात आले आहेत. सैनिक शाळांमध्ये विद्यार्थिनींना प्रवेश देण्यास चिनचिपमधून दोन वर्षांपूर्वीच सुरूवात झाली. विद्यार्थिनींच्या राहण्याच्या सोयीकरता 74 लाखांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. 


विद्यार्थिनी AISSEE2020 च्या माध्यमातून 'sainikschooladmission.in'या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. सहावीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी 10 ते 12 वर्षे वयोमर्यादा आहे तर नववीच्या वर्गात प्रवेश घेण्यातकरता 13 ते 15 वर्षे अशी वयोमर्यादा आहे. प्रवेश शुक्ल 400 रुपये असून यामध्ये सर्वसाधारण विभागातील विद्यार्थी प्रवेश नोंदणी करू शकतात. तर राखीव वर्गातील विद्यार्थिनींकरता प्रवेश शुल्क 250 रुपये असणार आहे. तसेच प्रवेश प्रक्रियेकरता प्रवेश परिक्षा घेण्यात येणार असून सहाव्या वर्गाकरता 300 मार्कांची  तर नवव्या प्रवेश परिक्षा 400 मार्कांची असणार आहे.