हैदराबाद : तेलंगणच्या नालगोंडामध्ये एका तरुणाच्या हत्येप्रकरणी जेव्हा पोलिसांनी खुलासा केला तेव्हा सैराट सिनेमाची अनेकांना आठवण झाली. कारण सैराट सिनेमा सारखीच घटना ही हैदराबादमध्ये घडली. प्रणय याने 6 महिन्यांपूर्वी सवर्ण जातीच्या अमृताशी लग्न केलं होतं. यामुळे अमृताचे कुटुंबीय नाराज होते. पोलिसांनी अमृताचे वडील मारुती राव, भाऊ श्रवण कुमार यांच्यासह आणखी 3 जणांना अटक केली आहे.( व्हिडिओ पाहा बातमीच्या शेवटी)


सीसीटीव्हीत कैद झाली घटना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रणय आपल्या प्रेग्नेंट पत्नीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना त्याच्यावर मागून एकाने कोयत्याने वार केला. यानंतर प्रणय जमिनीवर पडला. त्याची पत्नी अमृता लोकांना मदतीसाठी हाक मारत होती. पण तोपर्यंत प्रणयचा मृत्यू झाला होता.


अमृताने जबाबात तिच्या वडिलावरच संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर समोर आलं की, सासऱ्याने आपल्या जावयाच्या हत्येसाठी 10 लाखांची सुपारी दिली होती. पण या हत्येचा आपल्याला जराही पश्चाताप नसल्याचं सासऱ्याने म्हटलं आहे.