Viral News : पैसा (Money) कमावण्यासाठी माणूस आपलं अख्खं आयुष्य खर्ची घालवतो. तो कितीही कमावला तरी अनेकांचे समाधान होत नाही. पैसा मिळाला की आपलं आयुष्य सुखकर होईल असे अनेकांना वाटतं. या पैशामुळे माणसाचा स्वभाव देखील बदलवायला लागतो. अनेकवेळा पैसा कमावण्याच्या नादात आपण आपल्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी गमावून बसतो. असाच काहीसा प्रकार एका इंजिनिअर (engineer) तरुणासोबत घडला आहे. बंगळुरूस्थित एका सॉफ्टवेअर इंजिनीअरची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. भरपूर पैसा असूनही गर्लफ्रेंड न मिळणे हे सर्वात मोठे दुःख असल्याचे या इंजिनिअर तरुणाने म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळुरुच्या एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या या 24 वर्षीय इंजिनिअर तरुणाची पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. यापोस्टवरुन त्याला अनेकजण सल्ले देत आहेत तर अनेकजण समदुःखी असल्याचे म्हणत आहे. वर्षाला 58 लाख रुपये कमावूनही एकटेपणाने त्रस्त असल्याचे या तरुणाचे म्हणणे आहे. कारण त्याच्याकडे गर्लफ्रेन्ड नाही जिच्यासोबत आपले आयुष्य शेअर करू शकेल. माझे मित्र त्यांच्या आयुष्यात व्यस्त आहेत. माझ्या कामामध्ये नवीन काहीही घडत नाहीये कारण मी सुरुवातीपासूनच एकाच कंपनीत आहे. माझे जीवन मनोरंजक बनवण्यासाठी लोकांनी मला सल्ला द्यावा अशी इच्छा या तरुणाने व्यक्त केली आहे.


काय म्हटंलय या तरुणाने?


"बंगळुरुच्या FAANG कंपनीत मी 24 वर्षांचा सॉफ्टवेअर अभियंता असून मला 2.9 वर्षांचा अनुभव आहे. 58 लाख रुपये इतक्या वार्षिक पगारासह मी सभ्य जीवन जगत आरामात काम करत आहे. मी माझ्या आयुष्यात नेहमीच एकटा असतो. माझ्यासोबत वेळ घालवण्यासाठी मला एक गर्लफ्रेन्ड नाही आणि माझे इतर सर्व मित्र त्यांच्या आयुष्यात व्यस्त आहेत. माझे कामाचे आयुष्य देखील कंटाळवाणे आहे कारण मी माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून मी त्याच कंपनीत आहे आणि दररोज सारख्याच गोष्टी करतो आहे. मी आता यापुढे कामाच्या ठिकाणी नवीन आव्हाने आणि संधींची अपेक्षा करत नाहीये. कृपया मला माझे जीवन अधिक मनोरंजक कसे बनवायचे याबद्दल सल्ला द्या. जिमला जा असे म्हणू नका, कारण मी ते आधीच केले आहे," असे या तरुणाने म्हटलं आहे.



दरम्यान, सोशल मीडियावरील युजर्सनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी याबाब आश्चर्य व्यक्त केले आहे. तर काहींनी त्याच्याशी सहमती दर्शवत वैयक्तिक अनुभव शेअर केले आहेत. एका यूजरने म्हटले की, जीवन असेल तर संघर्षही आहेच. दुसऱ्या एका युजरने एकाकीपणाला शाप म्हटले आहे. एवढ्या व्यस्त जीवनात आपल्याला स्वतःसाठी आणि आपल्या प्रियजनांसाठी वेळ काढायला मिळत नाहीये, असेही एका युजरने म्हटलं आहे.