हैदराबाद : दक्षिण भारतातील तेलंगणा राज्यातील ७०० वर्ष जुनं वडाचं झाड आहे. या झाडाला वाचवण्यासाठी आता सलाईन लावण्यात आली आहे. झाडाला जी सलाईन लावण्यात आली आहे, त्यात एक किटननाशक आहे, या किटक नाशकामुळे किटक दूर राहण्यास मदत होणार आहे. हे झाड ३ एकर जागेत पसरलेलं आहे. हे जगातील २ नंबरचं मोठं झाड असल्याचं म्हटलं जात आहे. सलाईन लावल्यामुळे किटकनाशक थेंबा थेंबाने टाकल्याने, किटक मिटवण्यात मदत होणार आहे, असं एका कर्मचाऱ्याने सांगितलंय. तेलंगणातील महेबुबनगर जिल्ह्यातील पिल्लालामरी गावात हे झाड आहे.


७०० वर्ष जुना कल्पवृक्ष


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या झाडाला वाळवीपासून वाचवण्याचा प्रयत्न आहे. हा ७०० वर्ष जुना कल्पवृक्ष असल्याने येथे पर्यटकांची नेहमीच मांदियाळी असते. झाडाच्या झाडांनाही पाईपने बांधण्यात आलं आहे, त्यामुळे संक्रमण पसरणार नाही, असा त्यामागील उद्देश आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार काही झाडांना सिमेंट खंबे लावण्यात आले आहेत, ज्यामुळे झाड पडणार नाही.



वडाला लागली मोठ्या प्रमाणात वाळवी


या झाडाला खत देखील देण्यात आले आहे. या वडाच्या झाडाच्या फांद्या डिसेंबरपासून पडायला लागल्या होत्या, यामुळे या क्षेत्रात पर्यटकांना देखील मज्जाव करण्यात आला होता. झाडावर वाळवीने मोठा हल्ला चढवल्यासारखंच असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं, काही पारंब्या पर्यटक झोका म्हणून वापरत, त्या देखील आता तुटत आहेत.


वडाला सर्वात जास्त आयुष्य 


वडाचं झाड अतिशय मजबूत असतं, वडाच्या झाडाला आयुष्य देखील तेवढंच असतं, त्याला कल्पवृक्षही म्हणतात, हे झाड वेगाने वाढतं, वडाच्या फांद्यांना पारंब्या असतात, त्या खालच्या दिशेने वाढतात, आणि झाडाला आणखी मजबूत बनवतात.