जोधपूर : बॉलिवूड अभिनेता सलमान खानसाठी सध्या बॅड टाईम सुरु आहे. काळवीट शिकार प्रकरणात त्याला ५ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जोधपूरच्या न्यायालयाने सलमानच्या जामिनाचा निर्णय राखून ठेवला आहे. काही वेळातच सुनावणी होणार आहे. सलमान गेल्या २ दिवसांपासून जेलमध्ये आहे. सलमानच्या या वाईट वेळेत त्याच्या बहिणी त्याच्या सोबत आहेत. सलमान खानची बहिण अलवीरा आणि अर्पिता दोन्ही कोर्टामध्ये त्याच्यासोबत उपस्थित आहेत. निकालाच्या आधीच्या दिवशी देखील दोन्ही बहिणी चिंतेत झोपल्याच नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान सलमान खानची बहिण अलवीरा आणि अर्पिता सोबतच बॉडीगॉर्ड शेरा देखील कोर्ट रूममध्ये पोहोचले. कोर्टात पोहोचताच अलवीरा इतकी इमोशनल झाली की ती रडू लागली आणि रडता रडता बेशुद्ध झाली. अलवीराची स्थिती पाहता तिला सांभाळणं कठीण झालं होतं. अशा वेळी सलमानचा बॉडीगार्ड शेराने तिला सांभाळत कोर्टाच्या बाहेर आणलं.


सलमानच्या वकिलांना आशा आहे की आज सलमानला जामीन मिळेल. दुसरीकडे जर सलमानला आज जामीन नाही मिळाला तर मग ते हाय कोर्टात धाव घेतील. आज शनिवार आहे. त्यामुळे जर आज जामीन नाही मिळाला तर सोमवारी सलमानच्या वकिलांना हायकोर्टात जावं लागेल. त्यामुळे आणखी २ दिवस सलमानला जेलमध्येच काढावे लागतील.