नवी दिल्ली : समाजवादी पार्टीचे नेते तसेच मैनपुरीचे उमेदवार मुलायम सिंह यादव यांना शुक्रवारी अचानक लखनऊच्या संजय गांधी पीजीआयमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्यांचा नियमित तपास झाला. पीजीआयचे राकेश कपूर, प्रोफेसर अमित अग्रवाल, सुशील गुप्ता, डॉक्टर अभय वर्मा यांच्या टीमने त्यांच्या आरोग्याची तपासणी केली. पीजीआयने दिलेल्या आरोग्य अहवालानुसार मुलायम सिंह हे नियमित तपासासाठी आले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नियमित तपासणी सोबत मुलायम सिंह यांना अशक्तपणा असल्याचे सांगण्यात येत आहे. डॉक्टरांच्या टीमने त्यांचा मधुमेह देखील तपासला. मुलायम सिंह यांना पूर्ण तपासणी झाल्यानंतर सोडण्यात येणार आहे. शारिरीक अस्वस्थ्यामुळे ते मैनपुरी येथील सभेला संबोधित करु शकले नाही. 



मुलायम सिंह यांनी लोकसभा निवडणूक 2019 साठी मैनपुरी येथून उमेदवारी अर्ज भरला आहे. इथे 23 एप्रिलला मतदान होते. ते 23 एप्रिलला इटावाच्या सैफई येथे मतदान करण्यासाठी गेले होते. इटावाच्या सैफई मैनपुरीच्या जसवंतनगर विधानसभा क्षेत्रात येते. याआधी 19 एप्रिलला मैनपुरीमध्ये मुलायम सिंह यादव यांच्या समर्थनार्थ महाआघाडीची निवडणूक प्रचार सभा होती. यावेळी मुलायम सिंह यादव यांच्यासोबत बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांच्यासोबत समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव तसेच राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख अजित सिंह सहभागी झाले होते.