मुख्यमंत्र्यानी मागवलेल्या समोशांची चोरी; CID करणार सुरक्षा रक्षकांची चौकशी
CM Sukhvinder Singh Sukhu : देशात एक अजब चोरी झाली. मुख्यमंत्र्यांसाठी मागवलेले समोसे चोरीला गेले आहे. याची आता CID मार्फत चौकशी होणार आहे.
Himachal Pradesh Samosa : पैसे, मोबाईल, दाग दागिने तसेच मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याच्या घटना घडल्याचे आपण नेहमीच ऐकतो. मात्र, समोसे चोरीला गेल्याचे कधी ऐकले आहे का? मात्र, प्रत्याक्षात अशी घटना घडली. मुख्यमंत्र्यानी मागवलेल्या समोस्यांची चोरी झाली आहे. या अजब गजन चोरीची चौकशी थेट CID मार्फत केली जाणार आहे. सध्या हे समोसा चोरी प्रकरण चांगलेच चर्चेत आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये ही समोसे चोरीची घटना घडली आहे. हिमाचल प्रदेश मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू (CM Sukhvinder Singh Sukhu) यांनी रेडिसन हॉटेलमधून समोसे मागवले होते. मात्र, मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्यापर्यंत हे समोसे पोहचलेच नाहीत. यामुळे ते चांगलेच संतपाले आहेत. 21 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी हे समोसे मागवले होते. रॅडिसन ब्लू हॉटेलमधून मुख्यमंत्री सखू यांच्यासाठी समोस्यासह नाश्ताचे तीन बॉक्स मागवण्यात आले होते.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका उपनिरीक्षकाला मुख्यमंत्र्यांसाठी नाश्ता आणण्याची सूचना केली होती. उपनिरीक्षकाने हे काम एका एएसआय आणि एका हेड कॉन्स्टेबलकडे सोपवले. तीन बॉक्समध्ये समोसे आणि आणखी काही नाश्त्याचे पदार्थ मागवण्यात आले होते. नाश्त्याची व्यवस्था पाहणाऱ्या पर्यटन विभागाच्या कर्मचाऱ्याना देण्यात आली होती. मात्र, हा नाश्ता मुख्यमंत्र्यांसाठी आहे की नाही, याची खात्री कर्मचाऱ्यांना नव्हती. यामुळे शेवटी बॉक्समधील समोसे मुख्यमंत्र्यांकडे जाण्याऐवजी मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट (एमटी) विभागात पोहचवण्यात आले. येथील चुकून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हे समोसे खाण्यासाठी देण्यात आले.
समोसा प्रकरणाला राजकीय रंग
हिमाचल प्रदेशमधील या समोसा चोरी प्रकारणाला राजकीय रंग आला. या समोसा चोरीची CID मार्फत चौकशी होत असल्याने विरोधकांनी भाजप सरकावर निशाणा साधला आहे. समोसे चोरी प्रकरण हे सरकारविरोधी कृत्य असल्याचा दावा भाजपने केला आहे. तर, विरोधकांनी समोसा चोरी पेक्षा अनेक महत्वाची प्रकरणे असताना या घटनेची CID चौकशी करण्याची गरज काय असा प्रश्न उपस्थित केला आहे.