हा `बाहुबली` समोसा खा आणि जिंका 71000 रुपये, त्यासाठी `ही` एक अट..
Samosa Viral News : एका `बाहुबली` समोसाची बातमी व्हायरल होत आहे. कारणही तसेच आहे. हा समोसा जो कोणी खाणार, त्याला 71 हजारांचे बक्षीस मिळणार आहे. मात्र, त्यासाठी एक अट पूर्ण करणे आवश्यक आहे.
Samosa Viral News : समोसा म्हटले की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटते. मात्र, तुम्हाला समोसा खायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर 71000 रुपये जिंकण्याची संधी आहे. आता या बाहुबली समोसाची क्रेझ लोकांपर्यंत वाढत आहे. रेवडी आणि गजकासाठी प्रसिद्ध असलेले उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील 'बाहुबली' समोसा लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. बटाटे, मटार, पनीर, मसाले आणि ड्रायफ्रूट्सपासून तयार केलेला हा 12 किलो वजनाचा हा बाहुबली समोसा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
हा समोसा खाण्यासाठी आता स्पर्धा लागत आहे. मात्र, लावण्यात आलेले बक्षिस कोणाला जिंकता आलेले नाही. हा समोसा 30 मिनिटांत खाणाऱ्याला 71 हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पण तो पूर्णपणे खाणे प्रत्येकाच्याच झेपत नाही, असेच दिसून येत आहे. या बाहुबली समोशावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
12 किलो बाहुबली 'समोसा' लोकप्रिय!
लालकुर्ती स्थित कौशल स्वीट्सचे तिसर्या पिढीचे मालक शुभम कौशल म्हणाले की समोसे लोकांना आकर्षणाचे केंद्र बनवण्यासाठी 'काहीतरी वेगळे' करायचे आहे. याच कारणामुळे त्याच्या मनात 12 किलोचा बाहुबली 'समोसा' तयार करण्याची कल्पना आली. हा समोसा संपवणाऱ्यांना बक्षिसही लावण्यात आले आहे.
'समोसा' खाल्यास बाहुबलीला 71000 रुपये
दुकानदार शुभम कौशल यांनी सांगितले की, लोकांमध्ये बाहुबली समोस्यांची इतकी क्रेझ आहे की ते आता त्यांच्या वाढदिवसानिमित्त पारंपारिक केकऐवजी 'बाहुबली' समोसे कापण्यास प्राधान्य देत आहेत. अर्ध्या तासात समोसे पूर्णपणे खाल्ल्याबद्दल 71 हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आल्याचे शुभमने सांगितले.
बाहुबली 'समोसा' बनवायला लागतो इतका वेळ
हा बाहुबली समोसा बनवण्यासाठी शुभम कौशलच्या स्वयंपाकींना सुमारे 6 तास लागतात हे उल्लेखनीय. एका कढईमध्ये समोसा तळण्यासाठी दीड तास लागतो, असे दुकानदार शुभम कौशल यांनी सांगितले. बाहुबली समोसा बनवण्यासाठी 3 स्वयंपाकींची मेहनत लागते.
दुकानदाराने सांगितले की आमच्या दुकानातील बाहुबली समोस्यांनी फूड ब्लॉगर्स आणि सोशल मीडियावर प्रभाव टाकणाऱ्यांचेही लक्ष वेधून घेतले. स्थानिक लोकांशिवाय देशातील इतर शहरातील लोकही आम्हाला या बाहुबली समोशाबद्दल विचारत असतात. त्यांनी सांगितले की, लोकांना या बाहुबली समोसासाठी आगाऊ बुकिंग करावे लागेल. त्याने सांगितले की 12 किलो वजनाच्या समोसाची किंमत सुमारे 1,500 रुपये आहे.