नवी दिल्ली : आपल्या देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजे मुकेश अंबानी. अगदी नकळत आपल्या तोंडावर ते नाव येतं. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध मॅगझीन फोर्ब्सने भारतातील सर्वात श्रीमंत असलेल्या १०० व्यक्तींची यादी जाहीर केली होती. यात ६० वर्षांचे मुकेश अंबानी पुन्हा एकदा अव्वल ठरले होते. फोर्ब्सच्या नुसार त्यांची एकूण संपत्ती ३९ बिलियन डॉलर आहे. दुसऱ्या नंबरवर अजीज प्रेम जी, तिसऱ्या स्थानावर हिंदुजा फॅमेली आणि चौथ्या स्थानावर लक्ष्मी मित्तल आणि पाचव्यावर पी मिस्त्री आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याशिवाय या यादीत मुकेश अंबानींचे लहान भाऊ अनिल अंबानी २.४ बिलियन डॉलर संपत्तीसह ४५ व्या क्रमांकावर आहेत. मात्र बिहारच्या एका व्यक्तीने संपत्तीच्या बाबतीत अनिल अंबानींना देखील मागे टाकले आहे. 


पटना युनिव्हर्सिटी मधून बीकॉम केलेले संप्रदा सिंग हे अलकेम लेब्रोटीजचे संस्थापक आणि चेअरमन आहेत. सध्या ते मुंबईत राहतात. सध्या त्यांची कंपनी चांगलीच तेजीत आहे. २०१७ या आर्थिक वर्षात अलकेमची २०% अधिक प्रगती झाली आहे. संपद्रा सिंग हे जगभरात मेटल आणि मायनिंग किंग म्हणून ओळखले जातात. 


भारताच्या १०० श्रीमंत लोकांच्या यादीत पेटीएम चे विजय शेखर शर्मानी देखील स्थान पटकावले आहे. या यादीतील ते सर्वात कमी वयाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. ४४ वर्षांचे असलेले विजय शेखर शर्मा यांचा जन्म युपीमधील अलिगढ येथे झाला. डीटीयूमधून शिक्षण घेतलेल्या शर्मा यांची संपत्ती १.४७ बिलियन डॉलर इतकी आहे.