Sanjay Raut Slams Rahul Shevale On Aaditya Thackeray Allegations : शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांच्यावर जे आरोप शिंदे गटाचे राहुल शेवाळे (Rahul Shevale) यांनी केल्यानंतर आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी हे आरोप फेटाळले आहेत. आदित्य यांच्यावर आरोप करणे हा हलकटपणा आणि नीचपणा आहे. स्वत:वरच बलात्काराचे आरोप असणाऱ्यांनी हे आरोप करणे हे किती वैफल्यग्रस्त झाले आहेत, ते समजत आहे. राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल शेवाळे यांच्या आरोपांवर हल्लाबोल करत प्रत्युत्तर दिले आहे. जे शिवसेनेचे झाले नाहीत ते इतरांचे काय होणार, असा सवालही उपस्थित केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशांतसिंह राजपूत प्रकरण हे तेव्हाच्या विरोधी पक्षाने आम्ही सत्तेत असताना आशा प्रकारे उभे केले आणि शेवटी ते त्यांच्यावरच उलटले. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयसह अनेक तपास यंत्रणांनी केला. सुशांतसिंह राजपूत यांची आत्महत्याच होती हे सीबीआयनं सांगितलं आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआय सह इतर यंत्रणांनी केला, असे राऊत म्हणाले.


बिहार पोलीस आता तपास करणार का ? महाराष्ट्र पोलिसांचा विश्वास नाही का ? ज्यांनी हे प्रकरण काढलंय त्यांनी स्वत:चा आत्मा तपासावा.  राज्यात मुख्यमंत्र्यांवर जनक्षोभ आहेत. आपल्या घरातल्या सुद्धा खूप फाईली निघू शकतात.  जे शिवसेनेचे झाले नाहीत ते इतरांचे काय होणार, असा थेट सवाल राऊत यांनी विचारला आहे.


ज्यांच्यावर बलात्काराचे आरोप आहेत ते आरोप करत आहेत. फुटीर लोक किती खालच्या स्तराला गेलेत ते दिसत आहे. ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भूखंड प्रकरणात अडकले आहेत. त्यावरील लक्ष विचलित करण्यासाठी हे आरोप आहेत. हे सरकार भ्रष्टाचाराच्या ओझ्याने पडेल, असा दावा राऊत यांनी यावेळी केला. मला तुरुंगात टाकलं. आमची माणसं फोडण्याचा प्रयत्न केला. पणे ही शिवसेना खचणार नाही, मागे हटणार नाही. त्यांचं राज्य औटघटकेचं आहे. आमची सत्ता आल्यानंतर त्यांचा हिशोब 2024 ला होणार आहे. महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येणार ही काळ्या दगडावरची रेष आहे, असे राऊत म्हणाले.


दरम्यान, चीनमध्ये वाढता कोरोनाचा प्रकोप लक्षात घेता भारतातही निर्बंध लादण्याची शक्यता आहे. यावर राऊत म्हणाले, दोन वर्षांपूर्वी अमेरिकेचे डोनाल्ट ट्रम्प आले होते तेंव्हा कोव्हिड नव्हता का ?  भारत जोडो यात्रेतून लोकांच्या मनांत विचार रुजले आहेत, असे राऊत म्हणाले.