Teachers Diwali Viral Dance Video : दिवाळी आनंदाचा, उत्साहाचा आणि प्रकाशाचा सण...आपल्या प्रियजन आणि कुटुंबासोबत धमाल मस्ती करण्याचा हा सण...सोशल मीडियादेखील दिवाळीमय झाली आहे. सोशल मीडियावर दिवाळीची सण, पूजा, रांगोळी, सजावट इत्यादी असंख्य व्हिडीओ पाहिला मिळतं आहे. त्यात धमाल मस्ती करतानाचे दिवाळी पार्टीमधील डान्स व्हिडीओ अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. अशातच दिवाळीत नवनियुक्त शिक्षकांनी केलेला डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. (sapna choudhary songs teachers diwali dance viral video trending news)


'कमरिया गोले गोले...डोले राजाजी'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ बिहारमधील DIET मध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या नवनियुक्त शिक्षकांचं असल्याचं बोलं जातं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता भोजपुरी आणि हरियाणवी गाण्यांवर खुलेआम हे शिक्षत नाचताना दिसतं आहे. शिक्षकांच्या हा डान्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जातो आहे. प्रशिक्षणानंतर हे शिक्षक शाळेत काय शिकवतील असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. तर काही नेटकरी म्हणत आहे की, आपला सण साजरा करण्यात काय चुकीचं आहे यात...


व्हायरल झालेला व्हिडीओ हा सिवान डायट सेंटरचा आहे. या संस्थेत प्रशिक्षण घेत असलेल्या मुलं मुली रविवारी दिवाळी साजरी करताना सपना चौधरीच्या अनेक गाण्यांवर डान्स करताना दिसून आलेत. 'कमरिया गोले गोले...डोले राजाजी' या भोजपुरी गाण्यावर महिला शिक्षिकांचा डान्स नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 



'पल पल तेरी याद...'


त्याच बरोबर मास्तर साहेब सुद्धा महिलांचे ठुमके पाहून स्वत:ला थांबू शकले नाहीत. दुसर्‍या व्हिडीओमध्ये, एक पुरुष शिक्षक मोकळ्या मैदानात सपना चौधरीच्या 'पल पल तेरी याद..' या हरियाणवी गाण्यावर नाचताना दिसत आहेत. दिवाळीचा उत्साहात सर्व शिक्षक आनंदात आणि मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहेत. हे दोन व्हिडीओ प्रत्यक्षात सिवान डायटचे आहेत की नाही याची पुष्टी झी न्यूज करत नाही.



बिहारमध्ये 1 लाख 20 हजार शिक्षकांची भरती


बिहार लोकसेवा आयोगाने नुकतीच राज्यात 1 लाख 20 हजार 336 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.



नियुक्तीपत्रे मिळालेल्या या शिक्षकांना विविध जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षणासाठी DIET मध्ये प्रशिक्षण सुरू आहे.