उडीपी : 'राम मंदिर' मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. 


धर्मसंसदेत विधान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रामजन्मभूमिवर केवळ राममंदिरच बनायला हवे असे ते म्हणाले आहेत. कर्नाटकच्या उडीपीमध्ये सध्या 'धर्मसंसद' चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी आपले विचार मांडले.


वेगवेगळे अर्थ 


अयोध्या प्रकरणी ५ डिसेंबरला सुप्रीम कोर्टात अखेरची सुनावणी होणार आहे. त्या दरम्यान मोहन भागवत यांच्या या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले आहेत. 


भगवा फडकेल 


टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, राम मंदिरावर लवकरच भगवा झेंडा फडकवला जाईल, असे 'धर्मसंसद' मध्ये मोहन भागवत म्हणाले.  रामजन्मभूमि स्थळावर इतर कोणत्याही वास्तूचा पाया इथे रचला जाणार नाही. 


तोच दगड


रामजन्मभूमीवरच त्याच दगडांनी राम मंदिर बनेल असेही भागवत यांनी सांगितले. 


तर शांतीने जगू शकत नाही 


यावेळी भागवत यांनी गोरक्षेच्या मुद्द्यावरही भाष्य केले. आपल्या गायींच्या सुरक्षेसाठी जागरुक रहायला हवे. जर गोहत्येवर बंदी लागली नाही तर आपण शांतीने जगू शकत नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.