नवी दिल्ली : आज सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. देशाचे लोह पुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार पटेल यांना विविध स्तरातून श्रद्धांजली दिली जात आहे. देशात आज रन फॉर यूनिटी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच आज लोकार्पण करणार आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगातील या आठव्या आश्चर्याचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. हा जगातील सर्वात उंच पुतळा असणार आहे. हा पुतळा अमेरिकेच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षाही उंच आहे. नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर धरणाजवळ तो उभारण्यात आला आहे. लोकार्पण सोहळ्यासाठी भव्य तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी 10 वाजता येथे पोहोचणार आहेत.



दुसरीकडे दिल्लीमध्ये गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रन फॉर यूनिटीला हिरवा झेंडा दाखवला. याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वेंकैया नायडू आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सरदार पटेल चौकात सरदार वल्लभभाई पटेलांना श्रद्धांजली वाहिली. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती देश राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करत आहे.



पाहा कसा बांधण्यात आलाय हा पुतळा