identify Paithani : महिलावर्ग आणि साडी यांचं अनोखं नातं आहे, साडी आवडत नाही अशी एकही महिला सापडणार नाही, आपल्या साड्यांच्या कलेक्शनमध्ये एकतरी पैठणी असतेच किंवा असावी अशी प्रत्येकीची इच्छा असते. 
सध्या तर लग्नसराई  (wedding season) सुरु आहे, लग्नाच्या तारखा निघाल्या असतील, लग्नाचा बस्ता, साडी खरेदी सगळं काही सुरु असेल. अश्या वेळी लग्न म्हटलं कि पैठणी नेसणं हे आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण साडी खरेदीसाठी (saree shopping) दुकानात जातो, अस्सल पैठणी दाखवण्याची मागणी दुकानदाराकडे देतो. दुकानदार सुद्धा आपल्या समोर अनेक पैठण्यांचा खच टाकतो , प्युअर पैठणीची किंमत सर्वात जास्त असते असं सांगितलं जात, पण तुम्हाला माहित आहे का ? बऱ्याचदा अस्सल पैठणीच्या नावाखाली तुमची फसवणूक केली जाऊ शकते. बनावट पैठणी अस्सल पैठणीच्या नावाखाली विकून तुम्हाला फसवलं जात, पण काही अश्या टिप्स आहेत ज्यामुळे तुम्ही खरी पैठणी नक्कीच ओळखू शकाल. 


पैठणीचे दोन प्रकार (types of paithani)


पैठणी हि विणून बनवली जाते आणि मशीनवर सुद्धा बनते, हाताने विणलेली पैठणी खरी अस्सल पैठणी म्हणून ओळखाली जाते.हाताने संपूर्ण विणकाम केलेली पैठणी महाग असते, मशीनवर बनलेली पैठणी तुलनेने कमी महाग असते.  


कशी ओळखालं खरी (हाताने विणलेली ) पैठणी (paithani saree)


खरी पैठणी ओळखणं तस कठीण आहे, मात्र काही अश्या टिप्स आहेत ज्या तुम्ही फॉल्लो केल्यात तर मात्र तुम्ही असली नकली पैठणी ओळखू शकतात. (how to identify real paithani )


हातमागावर विणलेल्या पैठणीचे धागे पदराच्या दोन्ही बाजूनी तसेच दिसतात. मुळात ते दिसतच नाहीत. या प्रकारात धागा कुठेच कापला जात नाही. दोन्ही बाजूनी पहिली तरी पैठणी एकसारखीच दिसते सरळ किंवा उलट बाजू कळू येत नाही. 


साडीची बॉर्डर आणि पदरही सारखा असतो. यासोबतच खऱ्या पैठणीचं वैशिष्ठ्य म्हणजे पैठणीची जर कधीच काळी पडत नाही.याच्या अगदी उलट म्हणजे  मशीनच्या पैठणीचे धागे दोन्ही बाजूने वेगळे असतात आणि याउलट मशीनमध्ये बनवल्यामुळे पदराच्या दोन्ही बाजूचे धागे उसवल्यासारखे दिसतात. 


खरी पैठणी इतकी महाग का असते ? (price of paithani)


खरी पैठणी पण हातमाग यंत्रावर होते, महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध शहरं आहेत जिथे खास पैठणी तयार केली जाते,  पैठणीही हातमाग यंत्रावरच तयार होते. त्यासाठी राज्यातली अनेक शहरं प्रसिद्ध आहेत.


हातमागावर एक पैठणी तयार करण्यासाठी एका एका कारागिराला तब्बल १ महिना लागतो. ओरिजिनल पैठणीत शुद्ध जर असते शिवाय रेश्माचा वापर केला जातो. अशाप्रकारे विणलेली पैठणी खूप महाग विकली जाते.


10 हजारापासून सुरवात होऊन अगदी 1-2 लाखांपर्यंत पैठणी मिळते. 


कश्या प्रकारे फसवलं जातं 


पैठणीची क्रेझ खूप वाढू लागलीये सेमी पैठणी किंवा बनावट पैठणी आपल्याला खरी सांगून अव्वाच्या सव्वा किमतीत विकल्या जातात. त्यामुळे आता यापुढे पैठणी घायला जाल तर ती नीट पारखूनच घ्या आणि पैसे वाचवा...