Govt Jobs | 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी; थेट अप्लाय करण्यासाठी वाचा
बॉर्डर सेक्युरिटी फोर्स (BSF) मध्ये नोकरी करण्याची संधी आहे. 12 वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे
Sarkari Naukri 2022: बॉर्डर सेक्युरिटी फोर्स (BSF) मध्ये नोकरी करण्याची संधी आहे. 12 वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. बीएसएफच्या वतीने भरतीची अधिसूचना जारी केली आहे. यासाठी उमेदवारांचे वय 18 वर्षाहून अधिक आणि 25 वर्षाहून कमी असणे आवश्यक आहे.
देशाच्या सुरक्षा दलांमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी आहे. सुरक्षा दलांमध्ये भरती होऊन देशाची सुरक्षा करण्याची इच्छुक असलेल्या उमेदवारांना यासाठी अर्ज करता येणार आहे. अधिसूचनेनुसार ही भरती हवालदार पदासाठी असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी बीएसएफच्या अधिकृत साईटवर rectt.bsf.gov.in जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे.
एकूण 312 पदे
ASSISTANT SUB INSPECTOR (STENO) - 11
HEAD CONSTABLE (MINISTERIAL) - 312
अर्ज कधी करता येईल?
बीएसएफच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, या पदांवरभरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 20 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. अधिक माहितीसाठी बीएसएफच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देता येईल.
अर्ज करण्यासाठी पात्रता?
बीएसएफच्या या पदांसाठी उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षे दरम्यान असावे. आणि 12 उत्तीर्ण असावे. अधिकृत अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा..