Sarkari Naukri : (Government Jobs) शासनदरबारी नोकरीला असणाऱ्या प्रत्येकाचाच हेवा वाटतो. कारणं अनेक असतात, त्यापैकीतच एक कारण म्हणजे सरकारी नोकरीत मिळणारा पगार. खासगी नोकरीच्या तुलनेत सरकारी नोकरदार वर्गाला मूळ वेतन कमी असलं तरीही विविध भत्ते जोडून हातात येणारा पगाराचा आकडा मोठा असतो. शिवाय वेळोवेळी लागू होणारे वेतन आयोग आणि सरकारी सुविधांची बरसात आलीच. त्यामुळं खासगी नोकरी असणाऱ्यांनाही आपल्याला सरकारी नोकरी हवी होती राव... असं म्हणण्याचा मोह आवरता येत नाही. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या अशाच मंडळींसाठी ही महत्त्वाची बातमी. (Sarkari Naukri Notification 2023 latest update eligibility application)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरियाणा लोक सेवा आयोगाकडून नुकतंच उप मंडळ कृषी अधिकारी या पदावरील भरतीसाठी एक नोटिफिकेशन जारी केलं आहे. 16 मार्चपासूनच यासंबंधीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली असून,  http://hpsc.gov.in/ या संकेतस्थळावर सविस्तर माहिती मिळू शकते. 


हेसुद्धा वाचा : Video : असं काय करता दाजी... मराठमोळ्या लावणीने जपानच्या पंतप्रधानांचे भारतात स्वागत


 


37 पदांसाठीच्या या भरतीमध्ये, ऑनलाईन पद्धतीनं या भरती प्रक्रिया होणार असून, 21 मार्च 2023 पासून ही प्रक्रिया सुरु होणार आहे. 10 एप्रिल हा अर्ज करण्यासाठीचा शेवटचा दिवस असेल. 


शैक्षणिक पात्रता  


शैक्षणिक पात्रतेविषयी सांगावं तर, इच्छुक उमेदवार बीएससी (ऑनर्स) कृषी आणि एम.एससी (कृषी), मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण हिंदी किंवा संस्कृत विषयातून घेतलेला असावा. 18 ते 42 वयोगटातील उमेदवरा या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. सरकारी नियम आणि तरतुदींनुसार त्यांना आरक्षणाची सवलत मिळेल. 


अर्ज भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान एससी / एसटी / महिला / बीसी-ए / बीसी-बी / ईएसएम प्रवर्गातील उमेदवारांना 250 रुपये आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये इतकं शुल्क असेल. पगाराचं म्हणावं, तर Pay Matrix Level 7 नुसार 44900  ते 142400 इतका घसघशीत पगार या पदांसाठी दिला जाणार आहे. 


अर्ज करण्याची पद्धत (how to apply?)


- सर्वप्रथम http://hpsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. 
- संकेतस्थळाच्या होमपेजवर तुम्हाला अर्जाची एक लिंक मिळेल.  Advt No. 22 of 2023 - Sub Divisional Agricultural Officer and equivalent (Administrative Cadre) (Group-B) in Agriculture & Farmers Welfare Department, Haryana  या लिंकवर क्लिक करा. 
- तुमच्यासमोर अर्ज Open होईल. आता त्यामध्ये आवश्यक माहिती भरा. 
- शुल्क भरल्यानंतर हा अर्ज Submit करा. 
- अर्जाची Print न विसरता काढा.