Satya Pal Malik on Pulwama Attack: जम्मू काश्मीरला (Jammu Kashmir) केंद्रशासित प्रदेशाचा (Union territory ) दर्जा मिळण्याआधी शेवटचे राज्यपाल राहिलेले सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबद्दल केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराशी संबंधित काही अडचण नाही हे मी सांगू शकतो असं ते म्हणाले आहेत. दरम्यान केंद्राच्या चुकांमुळेच पुलवामा हल्ला (Pulwama Attack) झाल्याचं सांगितलं असता नरेंद्र मोदींनी मला शांत राहण्यास सांगितलं असा धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. सत्यपाल मलिक यांनी पत्रकार करण थापर यांना The Wire news पोर्टलसाठी मुलाख दिली असता त्यात हे विधान केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्यपाल मलिक यांना मोदी सरकारने 2017 मध्ये बिहारचं राज्यपाल केलं होतं. यानंतर 2018 मध्ये त्यांची जम्मू काश्मीरमध्ये बदली करण्यात आली होती. 2019 मध्ये पुलवामा हल्ला झाला. 2019 मध्ये भाजपा पुन्हा सत्तेत आल्यानंतर सत्यपाल मलिक यांच्यावर पुन्हा जबाबदारी सोपवण्यात आली. जम्मू काश्मीचा विशेष दर्जा काढून घेण्यात आला आणि इंटरनेट बंद करण्यात आलं होतं तेव्हा सत्यपाल मलिकच राज्यपाल होते. जेव्हा राज्य केंद्रशासित प्रदेश झाले तेव्हा मलिक यांची गोव्यातील राजभवनात बदली करण्यात आली.


या मुलाखतीत सत्यपाल मलिक यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा येथे लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर भाष्य केलं. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. नंतर निवडणुकीत हा मुद्दा चांगलाच गाजला होता. "सीआरपीएफ जवानांनी ताफा मोठा असल्याने जवानांना नेण्यासाठी एअरक्राफ्टची मागणी केली होती. त्यांनी यासंबंधी गृह मंत्रालयाकडे विचारणा केली होती. पण त्यांनी देण्यास नकार दिला. त्यांना फक्त पाच विमानं हवी होती. पण त्यांना एकही विमान देण्यात आलं नाही," असा गौप्यस्फोट सत्यपाल मलिक यांनी केला आहे.



पुलवामा हल्ल्याच्या आठवणी सांगताना सत्यपाल मलिक यांनी सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला उत्तराखंडच्या कॉर्बेट नॅशनल पार्कच्या बाहेरुन फोन केला होता. ते म्हणाले की "मी त्यांना त्याच संध्याकाळी ही आपली चूक असल्याच सांगितलं. जर आपण विमान दिलं असतं तर हे झालं नसतं. त्यांनी मला तुम्ही आता शांत राहा. मी याआधी काही चॅनेलला हे सांगितलं आहे. ते म्हणाले की, हे सगळं बोलू नका. ही वेगळी गोष्ट असून आम्हाला बोलू द्या. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही मला हे सगळं बोलू नका, तुम्ही शांत राहा असं सांगितलं. माझ्या लक्षात आलं की, हे सगळं आता पाकिस्तानच्या दिशेने जात असल्याने शांत राहण्यास सांगितलं जात आहे".


लष्कराचा ताफा ज्या रस्त्याने चालला होता त्याच्याशी जोडला जाणारा कोणताही रस्ता बंद करण्यात आला नव्हता असं सांगत सीआरपीएफने गृह मंत्रालयाला जबाबदार धरलं आहे. हे 100 टक्के गुप्तचर यंत्रणेचं अपयश आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. "ज्या कारने लष्कराच्या ताफ्याला धडक दिली त्यामध्ये जवळपास 300 किलो स्फोटकं होती. ही गाडी घटनेच्या 10 ते 12 दिवस जवळच्या परिसरात फिरत होती. पण कोणालाही थांगपत्ता लागला नाही," असं त्यांनी सांगितलं आहे.