`मन की बात`मध्ये पंतप्रधान मोदींकडून पाणी बचतीचा संदेश
43व्या `मन की बात`मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाणी बचतीचा संदेश दिला आहे.
नवी दिल्ली : 43व्या 'मन की बात'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाणी बचतीचा संदेश दिला आहे. जलसंरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे मोदींनी 'मन की बात'मध्ये म्हटलंय. यावेळी त्यांनी देशातील विद्यार्थी आणि युवकांना स्वच्छ भारत समर इंटर्नशिप कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. शाळा, कॉलेजला सुट्टी असल्याने तरुणाईने समाजासाठी योगदान देण्यात सिंहाचा वाटा उचलावा अशी अपेक्षाही मोदींनी व्यक्त केलीय. यावेळी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्यांचे मोदींनी कौतुक केलं आहे.
पदकं जिंकत भारतीय खेळाडूंनी देशवासियांच्या अपेक्षा पूर्ण केल्याचे गौरवोदगार मोदींनी काढलेत. याशिवाय अभिनेता अक्षय कुमारचेही मोदींनी कौतुक केलं आहे. फिट इंडियासाठी अक्षयने दिलेले योगदान महत्त्वाचे असल्याचे मोदींनी म्हटलं आहे.