Saving Management: सध्या सगळीकडेच महागाईचे (Inflation) वातावरण आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या खर्चाकडे (Expenses) विशेषत: लक्ष देणे बंधनकारक झाले आहे. आपण आपल्या खर्चाचे व्यवस्थापन (Financial Management) करू शकतो. खरं म्हणजे तुम्ही ज्याप्रकारे त्याचे व्यवस्थापन कराल त्याप्रमाणे तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट्स (Results) मिळत जातील. आता यावर्षीपासून आपण सगळ्यांनीच खर्च आणि बचतीचा (Savings and Expenses) आराखडा तयार केला असेलच. काहींना अजूनही हे करणं शक्य झालं नसेल तर आत्ताच तुम्ही बचत करण्याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. काहींना अजूनही बचत आणि खर्च यांचे योग्य गणित जुळवणे फार कठीण होऊ जाते. परंतु काळजी करू नका. या लेखातून नक्की बचत आणि खर्चाचे व्यवस्थापन (How to Save Money over expenses) कसे करावे हे जाणून घेऊ शकता. (Saving Tips how manange your expenses and saving to tackle the inflation business news in marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्याला जर का बचत करायची असेल आणि त्यातून चांगले पैसे कमावायचे असतील तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणे हे म्हत्त्वाचे आहे. यात महत्त्वाचे कारण म्हणजे खर्चाची (Expenses) बचत करणे आवश्यक ठरते. लहानपणापासून आपण आपल्या परिवारातील सदस्यांना आणि वडिलाधाऱ्या व्यक्तींना पैशांचा हिशोब (Account) लिहिताना पाहिले असलेच. न चुकता एका डायरीत हा सगळा हिशोब ठेवणारे आपले आईवडिल कधीच हिशोबात चुकले नव्हते. हो, तुम्हाला यामुळे आत्तापर्यंत लक्षात आले असेलच की, हिशोब ठेवणं हे आपल्यासाठी महत्वाचे आहे. तेव्हा आपल्या प्रत्येक खर्चाचा हिशोब ठेवण्याची वेळीच सवय लावा. याचा फायदा तुम्हालाच होऊ शकतो. आपल्या घरगुती वापरातला खर्च (Family Expensive) काही कमी नसतो. त्यासाठी आपल्याला अनेक गोष्टींचा खर्च असतो. तेव्हा हे लक्षात ठेवा की आपल्यालाही त्यानुसार आपले खर्च कमी असू देत नाहीतर जास्त तुम्हाला खर्च अपडेट करणं आवश्यक आहे. 


बजेटचं असं व्यवस्थापन करा -


आपल्याला आपल्या बजेटचं व्यवस्थापन करणं आवश्यक असते म्हणजे, आपल्या बजेटमध्ये खर्च किती आहेत? त्यातून आपले महत्त्वाचे खर्च किती आहेत, त्यानंतर आप्तकालीन खर्च सुरक्षित ठेवणंही आवश्यक ठरते तेव्हा अशा सर्व गोष्टींची नोंद ठेवत आपल्यालाही त्या संदर्भात आपल्या बचतीचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यापद्धतीनं आपल्या बचतीला प्राधान्य द्या. त्यात कसलीही कसर करू नका. आपल्या खर्चाची स्पीडही लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सध्या आपल्या गरजाही प्रचंड वाढू लागल्या आहेत त्यामुळे आपल्यालाही त्यानुसार प्लॅनिंग (Planning) करणं आवश्यक आहे. विनाकारण वायफळ खर्च करणं टाळा कारण तोच खर्च तुम्ही कुठेतरी योग्य ठिकाणी करू शकाल ज्यात तुमच्या आवडीचा खर्चही येऊ शकेल. 


लक्ष्य निश्चित करा -


तुम्हाला तुमचे लक्ष्य (Goal) निश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण बचत करणाऱ्यांनी आपल्याला कितपत बचत करणे आवश्यक आहे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यातून सर्वात म्हत्त्वाचे म्हणजे कालावधी. तुम्हाला कधीपर्यंत किती पैसे बचत करून आपले ध्येय साकार करायचे आहे हे सर्वात महत्त्वाचे ठरते. तेव्हा अशा सोप्या टीप्स वापरून तुम्ही योग्य पद्धतीनं मॅनेजमेंट (Management) करू शकता.