SBI Alert : ऑनलाईन वीजबिल भरत असाल तर सावधान! तुमची होऊ शकते अशी फसवणूक
SBI Alert : तुम्हीही वीज बिल ऑनलाइन भरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुमची एक चूक तुमचे बँक खाते रिकामी करू शकते. यासाठी बँकेने अलर्ट जारी केला आहे.
SBI Alert Customers: देशातील सर्वात मोठ्या बँकेने ऑनलाइन वीज (electricity bill ) बिल भरणाऱ्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. दरम्यान सायबर गुन्हेगारांनी (cybercriminals) आता फसवणुकीचा नवा मार्ग शोधला आहे. अनेक वीज कंपन्या आणि पुरवठादार ग्राहकांना बिल जारी झाल्यावर एसएमएस (sms) किंवा व्हॉट्सअॅप (whatsapp) संदेशाद्वारे बिलाची रक्कम आणि बिल भरण्याची शेवटची तारीख पाठवणूक सायबर ठग लोकांना आपल्या जाळ्यात अडकवतात.
अशाप्रकारे पाठवतात SMS
वीज बिलाची (electricity bill ) थकबाकी अशा मेसेजमध्ये सांगतात आणि ते अपडेट करण्यासाठी दिलेल्या नंबरवर ताबडतोब कॉल (calling) करण्यास सांगतात. एवढेच नाही तर मेसेजमध्ये तुमची वीज खंडित करण्यात येईल, अशी धमकी देऊन जाळ्यात अडकवतात. असे केल्याने तुमची आर्थिक माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि ते तुमची फसवणूक करतात.
एसबीआय अलर्ट
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानेही (SBI) अशा प्रकारचे संदेश देऊन लोकांना सतर्क केले आहे. याबाबत ट्विटरवर अनेकांनी असे मेसेज येत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. अशा कोणत्याही मेसेजला उत्तर देऊ नका किंवा त्यावर कॉल करू नका, असे बँकेने म्हटले आहे. असे केल्याने तुमचे खाते रिकामे होऊ शकते. वीज मंडळ किंवा पुरवठादार सहसा अधिकृत क्रमांकावरूनच एसएमएस पाठवतात. त्यामुळे नेहमी तपासा.
वाचा : तुम्ही Credit Card वापरता? मग ही बातमी वाचाच!
फसवणुकीपासून सावध रहा
जर तुम्ही वीज बिल ऑनलाइन (electricity bill ) भरत असाल, तर अशा संदेशांबाबत तुम्ही तुमच्या वीज कंपनीशी किंवा पुरवठादारांशी संपर्क साधून देखील वीज बिल अपडेट करू शकता. ऑनलाइन पेमेंट किंवा कोणतीही आर्थिक क्रियाकलाप करताना नेहमी क्रॉस चेकिंगद्वारे सत्यापित करा.