SBIने ग्राहकांना दिला इशारा! QR कोड स्कॅन करताना सावधान, अन्यथा फसवणूक अटळ
SBI Alert Customers: आजकाल ऑनलाइन बँकिंग आणि व्यवहारांमध्ये वाढ होत आहेत. आजकाल किरकोळ मालाच्या दुकानांवरही QR कोड स्कॅनर दिसतात.
मुंबई : SBI Alert Customers: आजकाल ऑनलाइन बँकिंग आणि व्यवहारांमध्ये वाढ होत आहेत. आजकाल किरकोळ मालाच्या दुकानांवरही QR कोड स्कॅनर दिसतात. आजकाल अनेक लोक व्यवहारासाठी स्कॅनर वापरतात, परंतू दुसरीकडे ऑनलाइन फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्येही सातत्याने वाढ झाली आहे.
गेल्या काही वर्षांत क्यूआर कोडच्या माध्यमातून फसवणुकीच्या घटनाही समोर आल्या आहेत. QR कोड फसवणुकीचे वाढते प्रकरण लक्षात घेता, देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक SBIने आपल्या 44 कोटी ग्राहकांना सतर्क केले आहे.
ट्विटद्वारे दिली माहिती
एसबीआयने आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत लोकांना आर्थिक बाबींमध्ये शिक्षित करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत एसबीआयने गुरुवारी ट्विट केले की 'QR कोड घोटाळ्यापासून सावध रहा. स्कॅन करण्यापूर्वी विचार करा, अज्ञात आणि असत्यापित QR कोड स्कॅन करू नका. सावध रहा आणि SBI सह सुरक्षित रहा.
अशा प्रकारे QR कोडद्वारे होते फसवणूक
SBI ने सांगितले की QR कोड नेहमी पेमेंट करण्यासाठी वापरला जातो, पेमेंट घेण्यासाठी नाही. जर तुम्हाला पेमेंट 'प्राप्त' करण्याच्या नावावर QR कोड स्कॅन करण्याचा संदेश किंवा मेल आला तर चुकूनही स्कॅन करू नका. यामुळे तुमचे खाते रिकामे होऊ शकते. तुमच्या खात्यातून पैसे वजा होऊ शकतात. खरे तर यासाठीही
फसवणुक टाळण्यासाठी या टिप्स करा फॉलो
बँकेने काही सुरक्षा टिपा दिल्या आहेत ज्या तुम्हाला समजून घेणे आवश्यक आहे.
कोणतेही पेमेंट करण्यापूर्वी UPI आयडी सत्यापित करा.
UPI पेमेंट करताना काही सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
UPI पिन फक्त पैसे पाठवण्यासाठी आवश्यक आहे पैसे मिळवण्यासाठी नाही.
पैसे पाठवण्यापूर्वी नेहमी मोबाईल नंबर, नाव आणि UPI आयडी सत्यापित करा.
UPI पिन कधीही कोणाशीही शेअर करू नका.
निधी पाठवण्यासाठी स्कॅनरचा योग्य वापर करा.
कोणत्याही परिस्थितीत, अधिकृत स्त्रोतांव्यतिरिक्त इतर मार्गांनी पैसे पाठवू नका.
कोणत्याही विसंगतीच्या बाबतीत, बँकेच्या तक्रार निवारण पोर्टल https://crcf.sbi.co.in/ccf/ द्वारे निराकरण करा.