SBI Recruitment 2023 Start From Today: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) हजारो पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 6 हजार 160 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षे दरम्यान असावे.


निवड प्रक्रिया


ऑनलाइन लेखी परीक्षा आणि स्थानिक भाषा चाचणीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.  लेखी परीक्षेत 100 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातील. परीक्षेचा कालावधी 60 मिनिटांचा आहे. 


मुंबई पालिकेत नवीन पदांची भरती, पदवीधरांना 41 हजारपर्यंत मिळेल पगार


सामान्य इंग्रजी चाचणी वगळता, लेखी परीक्षेसाठी 13 प्रादेशिक भाषांमध्ये प्रश्न तयार करण्यात येतील. या भाषांमध्ये इंग्रजी आणि हिंदी भाषेव्यतिरिक्त आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू, उर्दू या भाषांचा समावेश आहे.


अर्ज शुल्क 


एसबीआय अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या सामान्य / ओबीसी/ ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना 300 रुपये शुल्क भरावे लागेल. तर एससी/एसी/पीडब्लयूबीडी श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्कातून सवलत देण्यात आली आहे. SBI च्या अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.


पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा


अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये बंपर भरती, मुंबईत नोकरीसह 55 हजारपर्यंत पगार; ही संधी सोडू नका


SBI अप्रेंटिस भरतीची अर्ज प्रक्रिया 1 सप्टेंबर 2023 पासून सुरु होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 21 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या उमेदवारांची लेखी परीक्षा ऑक्टोबर/नोव्हेंबर 2023 मध्ये होणार आहे. अधिकृत साइट sbi.co.in वर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.


SBI च्या मुंबई शाखेत नोकरी आणि 85 लाखांपर्यंत पगार


स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेत सिनीअर वाइस प्रेसिडंटचे पद भरले जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पीजीडीएम/ पीजीडीबीएस/ एमबीए किंवा त्या समकक्ष पदवी पूर्ण केलेली असावी. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित कामाचा 15 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. 


29 ऑगस्ट 2023 रोजी 40 वर्षे ते 45 वर्षपर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांना अर्जासोबत 750 रुपये शुल्क भरावे लागले. एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. सिनीअर वाइस प्रेसिडंट पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक 85 लाखापर्यंत पगार दिला जाणार आहे.