नवी दिल्ली : नव्या वर्षात स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)ने आपल्या ग्राहकांना एक खास गिफ्ट दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसबीआयने आपल्या बेस रेट आणि मार्क प्राइम लेंडिंग रेटमध्ये ३० बेसिस पॉईंटने कपात करण्याची घोषणा केली आहे. एसबीआयचे नवे दर १ जानेवारी २०१८ पासून लागू झाले आहेत.


सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या असलेल्या एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडियाने आपला बेस रेट ८.९५ टक्क्यांवरुन ८.६५ टक्के केला आहे. तसेच बीपीएलआरही १३.७० टक्क्यांवरुन १३.४० टक्के केला आहे. याचा फायदा एसबीआयच्या जवळपास ८० लाख ग्राहकांना होणार आहे.


एसबीआयने घेतलेल्या या निर्णयामुळे गृह कर्ज घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच बँकेने गृह कर्जाच्या प्रोसेसिंग शुल्कात दिलेली सूट ही ३१ मार्चपर्यंत वाढवली आहे.


गृह कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्वाचं


कर्जाची रक्कम बेस रेट (% मध्ये) कर्जाचा कालावधी हफ्ता
३० लाख रुपये ८.९५ २० २६,८९५.३८ रुपये
३० लाख रुपये ८.६५ २० २६,३२०.२१ रुपये
    EMI मध्ये होणारी बचत ५७५.१७ रुपये
 

 


ऑटो कर्ज घेणाऱ्यांसाठी


कर्जाची रक्कम व्याज दर (% मध्ये) कर्जाता कालावधी  हफ्ता
५ लाख रुपये ९.६५ ५  १०,५३७.६२ रुपये
५ लाख रुपये ९.६५ ५  १०,४६४.३२ रुपये
    EMI मध्ये होणारी बचत ७३.३ रुपये