मुंबई : देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने (SBI) आज कर्जाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे होम लोन आणि कार लोन स्वस्त होणार आहे. ग्राहकांना याचा फायदा 1 ऑक्टोबरपासून होणार आहे. एसबीआयने म्हटलं आहे की, एमएसएमई, हाउसिंग आणि रिटेल लोनच्या बाबतीत रेपो रेट एक्सटर्नल बेंचमार्क म्हणून लागू केला जाईल. बँकेने हा निर्णय़ भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 4 सप्टेंबर 2019 च्या नोटीफिकेशन नंतर घेतला आहे. 1 ऑक्टोबरपासून हा निर्णय़ लागू होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय स्टेट बँकेने ही नवी योजना MSME सेक्टरला अधिक लोन देण्याच्या उद्देशाने आणली आहे. याआधी एसबीआयने 1 जुलै 2019 ला फ्लोटिंग रेटवर होम लोन लागू केलं होतं. 1 ऑक्टोबर 2019 ला हा निर्णय लागू झाल्यानंतर छोट्या आणि मध्यम क्षेत्रातील कंपन्यांना फायदा होणार आहे.


नवीन सर्विस चार्ज


स्टेट बँक आपल्या ग्राहकांकडून 1 ऑक्टोबर 2019 पासून सर्विस चार्ज ऐवजी नवीन चार्ज घेण्याची तयारी करत आहे. जर तुमचं एसबीआय अकाऊंट हे मोठ्या मेट्रो शहरामध्ये आहे. तर तुम्हाला 5000 रुपये कमीत कमी खात्यात ठेवावे लागणार आहेत. जर तुमचं खातं शहरात असेल तर 3000 रुपये तुम्हाला खात्यात ठेवणं अनिवार्य असणार आहे.


जर तुमच्या खात्यात 3000 पेक्षा कमी रक्कम असेल तर तुम्हाला त्याच्या 75 टक्के म्हणजेट 15 रुपये+ जीएसटी दंड म्हणून लागणार आहे. सध्या हा दंड 80 रुपये+ जीएसटी आहे.