नवी दिल्ली : भारतीय स्टेट बँक(एसबीआय) ने बल्क डिपॉझिट रेट १ टक्क्यांनी वाढवलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बँकेच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, एक कोटी रुपये अथवा त्याहून अधिक(बल्क डिपॉझिट) टर्म डिपॉझिटवर एक टक्के अधिक व्याज मिळेल. हे नवे व्याजदर ३० नोव्हेंबरपासून लागू करण्यात आलेत. 


स्टेट बँकेने एका वर्षााहून अधिक काळानंतर बल्क डिपॉझिटच्या व्याजदरात बदल  केलेत. २ वर्षाहून कमी काळासाठीच्या बल्क टर्म डिपॉझिटवर ३.७५च्या ऐवजी ४.७५ टक्के आणि ४.२५ च्या ऐवजी ५.२५ टक्के व्याजदर मिळेल.


तर २ ते १० वर्षांसाठी जमा झालेल्या रकमांवर आता ४.२५ च्या ऐवजी ५.२५ टक्के व्याज मिळेल. जर वरिष्ठ नागरिकांना २ वर्षाहून कमी काळासाठीच्या रकमेवर ५.७५ टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल. तर दोन ते १० वर्षांसाठीच्या बल्क टर्म डिपॉझिटवर ४.७५च्या ऐवजी ५.७५ टक्के व्याज मिळेल. या महिन्याच्या सुरुवातीला एसबीआयने फिक्स डिपॉझिटच्या दरात २५ बेसिस पॉईंटची कपात केली होती.