SBI च्या `या` स्कीममधून मिळणार चांगले रिटर्न्स
जाणून घ्या स्किमची संपूर्ण माहिती
मुंबई : गुंतवणूक करून अनेकजण आपलं भविष्य आणखी सुरक्षित करण्याचा विचार करत असतात. मात्र चुकीच्या ठिकाणी केलेली गुंतवणूक अनेकदा प्रश्न निर्माण करू शकतात. यामुळे गुंतवणूक करताना योग्य ती माहिती मिळवणं महत्वाचं आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांसाठी Annuity Scheme घेऊन येत आहे.
Annuity Schemeचे फीचर्स
१. एसबीआयच्या सर्व शाखांमध्ये Annuity Scheme मध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते
२. Annuity Scheme यामध्ये कमीत कमी 25 हजारांची गुंतवणूक करावी लागेल
३. एसबीआयचे कर्मचारी आणि माजी कर्मचाऱ्यांना 1 टक्के जास्त व्याज मिळेल.
४. वरिष्ठ नागरिकांना 0.5 टक्के अधिक व्याज मिळेल.
५. Term Deposit चे व्याज दर या योजनेवर देखील लागू होणार
६. Annuity चे पैसे डिपॉझिट झाल्यानंतर पुढील महिन्यापासून ते ग्राह्य धरणार आहेत.
७. Annuity चे पैसे TDS कापून बचत किंवा चालू खात्यात भरले जातील.
८. एक रक्कमी पैसे भरल्यास चांगले रिटर्न्स मिळतील. याकरता चांगले प्लान्स आहेत.
९. विशेष परिस्थितीत Annuity च्या रक्कमेवर 75 टक्के कर्ज मिळू शकेल.
१०. बचत खात्यातून Annuity Scheme मध्ये चांगले रिटर्न्स मिळतील.
SBI ची एन्युटी स्कीम
SBI च्या या स्कीममध्ये 36,60,84 आणि 120 महिन्यांचा कालावधी या गुंतवणूकीसाठी दिला आहे. या गुंतवणूकीत निवडलेला कालावधी आणि टर्म डिपॉझिटवरून व्याजदर मिळणार आहे. समजा, तुम्ही 5 वर्षांसाठी गुंतवणूक केली. तर तुम्हाला 5 वर्षांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर व्याज मिळणार. या स्कीमचा फायदा भारतात कुणीही घेऊ शकतो.
गुंतवणूकीचे नियम
SBI च्या एन्युटी स्कीममध्ये कमीत कमी हजार रुपये दर महिन्याला भरण्याचा नियम आहे. मात्र सर्वाधिक कितीही रक्कम गुंतवणूकदार भरू शकतो. एन्युटी पेमेंटमध्ये ग्राहकांकडून जमा झालेल्या रकमेवर व्याज लावून इनकम सुरू केली जाते. भविष्याकरता ही स्कीम अतिशय सुंदर आहे.