श्रीनगर : दल लेक ( dal lake) नेहमीच पर्यटकांसाठी आकर्षण ठरलं आहे. आता एसबीआयचे फ्लोटिंग एटीएम त्यामध्ये आणखी एक अनोखे आकर्षणाचं केंद्र बनलंय. एसबीआयचे ( SBI ATM ) हे फ्लोटिंग एटीएम येथील लोकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हाऊसबोटमध्ये फ्लोटिंग एटीएम 


SBI ने एका ट्विटमध्ये सांगितले की, त्याचे फ्लोटिंग एटीएम श्रीनगरमधील दल लेकला भेट देणाऱ्या पर्यटकांसह स्थानिक लोकांच्या रोख गरजा पूर्ण करेल. एसबीआयचे अध्यक्ष दिनेश कुमार यांनी स्वतः या फ्लोटिंग एटीएमचे उद्घाटन केले. हे एटीएम हाऊसबोटमध्ये उघडण्यात आला आहे.


या एटीएमचे उद्घाटन करण्यासाठी एसबीआयचे अध्यक्ष श्रीनगरला पोहोचले तेव्हा ते श्रीनगरच्या एसबीआय शाखेतही गेले. एसबीआयची ही शाखा एसबीआय इम्पीरियल बँक ऑफ इंडिया होती तेव्हापासून कार्यरत आहे. त्याच प्रसंगी त्यांनी एसबीआयच्या टांगमार्ग शाखेचे उद्घाटनही केले जे गुलमर्गला भेट देणाऱ्या प्रवाशांना बँकिंग सुविधा पुरवेल.



श्रीनगरच्या दल सरोवरात तरंगणारी हाऊसबोट आणि शिकारा राइड प्रत्येकासाठी आनंददायी ठरत आहे. त्याचबरोबर SBI चे फ्लोटिंग एटीएम हे एक नवीन आकर्षण आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का की श्रीनगरच्या दल सरोवरात देशातील एकमेव फ्लोटिंग पोस्ट ऑफिस देखील आहे. हे देखील येथे भेट देणाऱ्यांना नेहमीच आकर्षित करते.