मुंबई : सणासुदीच्या दिवसात घर, गाड्या, खरेदी करण्याच्या बेतात असाल, तर ही बातमी महत्वाची आहे. देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या भारतीय स्टेट बँकेनं सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी खास कर्ज योजना आणल्या आहेत. गाड्या खरेदी करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या कर्जासाठी प्रक्रिया शुल्क म्हणजे प्रोसेसिंग फी माफ करण्यात येणार आहे. तर गृह, गाड्या आणि वैयक्तिक कर्जावर आकारण्यात येणारे व्याजदरही कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याशिवाय वैयक्तीक कर्ज आणि शैक्षणिक कर्जाच्या परतफेडीसाठी मोठा कालावधीही मिळणार आहे. गाड्यांसाठीचं कर्ज अवघ्या 8.70 टक्के दरानं मिळणार असून ठराविक कालावधीसाठी हा दर स्थिर ठेवला जाणार आहे. 


शिवाय नोकरदार वर्गाचं चार चाकी गाडीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी किमतीच्या तब्बल 90 टक्के कर्ज मिळणार आहे. शिवाय बँकेचा गृहकर्जावरील व्याज दर बाजारात सर्वात कमी म्हणजे 8.05 टक्के इतका आहे. त्यामुळे गृहकर्ज घेणाऱ्यांसाठीही ही महत्वाची बाब आहे.