मुंबई : आपल्या बाततीत अनेक वेळा असे झाले असले की, तुम्ही जेव्हा एटीएममधून (ATM) कॅश काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कमी बॅलन्समुळे पैसे काढण्याचा व्यवहार फेल होतो. परंतु कमी शिल्लक असल्यामुळे व्यवहार अयशस्वी झाला. आतापर्यंत तुमची ही चूक माफ केली जात होती. परंतु आता जर तुम्ही एसबीआयच्या (SBI) एटीएममधून (ATM) पैसे काढून घेताना एखादी चूक झाली तर याचा भार खिशावर पडणार आहे.


 रिझर्व्ह बँकेत खाते उघडता येणार


जाणून घ्या SBIचे नवीन नियम 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसबीआयच्या नव्या नियमांनुसार जर तुम्ही खात्यात जमा झालेल्या रकमेपेक्षा एसबीआय एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला 20 रुपये दंड आणि जीएसटी भरावा लागेल. जरी आपण एखादी चूक केली असेल तर ही चूक आपल्याला चांगलीच भारी पडणार आहे. Low Balance व्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणामुळे जर व्यवहार अयशस्वी झाला तर एसबीआय शुल्क आकारणी होणार नाही.


दंड कसा टाळावा


दंड टाळण्याचा पहिला मार्ग म्हणजे आपल्या खात्यात जमा झालेल्या रकमेची माहिती ठेवणे. काही माहिती नसल्यास अकाउंट बॅलन्स जाणून घेण्यासाठी एसबीआयची बॅलन्स चेक सर्व्हिस वापरा, जी एसबीआयने ट्विटद्वारे दिली आहे. कस्टमर केअरवर कॉल करून शिल्लक देखील जाणून घेऊ शकता. एटीएममधून रोकड काढण्यापूर्वीही बॅलन्स चेक करता येतो. जर तुम्ही ऑनलाईन एसबीआय वापरत असाल तर तेथूनही माहिती घेता येईल. 


याशिवाय गूगल पे किंवा फोन पे अ‍ॅपवरही बॅलन्स तपासता येतो. एटीएम व्यवहाराबद्दल आणखी एक गोष्ट म्हणजे, एसबीआय मेट्रो सिटी ग्राहकांना दरमहा 8 एटीएम व्यवहार करता येतात. एसबीआय एटीएममधून 5 आणि अन्य 3 बँक एटीएममधून व्यवहार करुण्याची मुभा आहे. त्याचबरोबर, मेट्रो शहर नसलेल्या ग्राहकांसाठी 10 विनामूल्य एटीएम व्यवहार करता येतात. एसबीआय एटीएममधून 5 आणि इतर बँकांच्या एटीएममधून 5. अधिक व्यवहारांसाठी बँक शुल्क आकारते.


गतवर्षीही बदला होता मोठा नियम  


एसबीआयने सप्टेंबर 2020 मध्ये एक नियम बदलला. जर तुम्हाला एसबीआयच्या एटीएममधून 10 हजार किंवा त्याहून अधिक पैसे काढायचे असतील तर फक्त एक पिन प्रविष्ट करणे पुरेसे नाही. तुम्हाला एटीएममध्ये बँकेत नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर वन टाइम पासवर्ड (ओटीपी) देखील भरावा लागेल, तरच पैसे काढले जातील.