SBI New Toll Free: SBIची 45 कोटी ग्राहकांसाठी नवीन सेवा, रविवारीही मिळणार विशेष सुविधा
SBI New Toll Free: तुमचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
मुंबई : SBI New Toll Free: तुमचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा सुरु केली आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी बँकेच्यावतीने सातत्याने काम केले जात आहे. SBI ने सुरु केलेल्या नवीन सुविधेनंतर आता तुम्हाला बँकिंग सेवेसाठी जवळच्या शाखेत जाण्याची गरज नाही.
शनिवारी आणि रविवारीही सुविधा मिळणार
बँकेने सुरु केलेल्या नव्या सेवेअंतर्गत तुम्हाला फोनवर अनेक महत्त्वाच्या सुविधा मिळणार आहेत. SBI ने अलीकडेच जारी केलेल्या दोन नवीन टोल फ्री नंबरवर कॉल करुन तुम्ही फोनवर बँकिंग सेवेचा लाभ घेऊ शकता. एवढेच नाही तर ही सेवा तुम्हाला शनिवार आणि रविवारीही मिळणार आहे.
SBI ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर आणि वेबसाइटवर माहिती देताना सांगितले की, लँडलाइन आणि मोबाइल नंबर बँके सेवेबद्दल माहिती उपलब्ध असेल. SBI संपर्क केंद्राच्या टोल फ्री क्रमांकावर 1800-1234 किंवा 1800-2100 वर कॉल करुन तुमच्या बँकिंग गरजा पूर्ण करु शकता. हे टोल फ्री क्रमांक सर्व लँडलाईन आणि मोबाईल फोनवरुन उपलब्ध असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. या क्रमांकांवर बँकेकडून तुम्हाला पाच प्रकारच्या सेवा दिल्या जात आहेत.
24x7 मिळणार ही सेवा
- अकाउंट बॅलन्स आणि मागिल पाच व्यवहारांचे तपशील
- एटीएम कार्ड ब्लॉक केलेल्या गेल्या पाच व्यवहारांचे तपशील आणि डिस्पॅच स्टेटस
- चेक बुक डिस्पॅच स्टेटस
- बचतीवरील व्याज याची माहिती
- नवीन एटीएम कार्डच्या ई-मेलवर टीडीएस माहिती मिळेल
SBI ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे आणि तिचे ग्राहक 45 कोटी ग्राहक आहेत. याआधी मे महिन्यात बँकेने मुदत ठेवीवरील व्याजदरात (एफडी व्याजदर) वाढ केली होती. नवे दर बँकेने 10 मे पासून लागू केले आहेत.