मुंबई : SBI 5 Year Tax saving FDs: जर तुम्ही निश्चित उत्पन्नासह कर बचतीचा पर्याय शोधत असाल, तर तुम्ही SBI च्या कर बचत FD योजनेत गुंतवणूक करु शकता. यामध्ये केलेल्या 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर आयकर कलम 80C अंतर्गत कर कपातीचा दावा केला जाऊ शकतो. टॅक्स सेव्हिंग एफडीचा लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा असतो. यामुळे पगारदार कर्मचाऱ्यांसाठी हा सुरक्षित पर्याय मानला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

SBIच्या कर बचत FD योजनेत गुंतवणूक केल्याने परिपक्वतेवर परतावा करपात्र आहे. SBI च्या FD स्कीममध्ये, किमान 1,000  रुपये भरुन खाते उघडता येते. यामध्ये कोणतीही कमाल ठेव मर्यादा नाही.


SBI FD: 5 लाख ठेवीवर 1.53 लाख व्याज


SBIच्या FD योजनेंतर्गत, नियमित ग्राहकांना 5 वर्षांच्या मुदत ठेवींवर 5.40 टक्के वार्षिक व्याज देत आहे. जर तुम्ही 5 लाख रुपयांची FD केली तर मॅच्युरिटीवर तुम्हाला 6,53,800 रुपये मिळतील. यामध्ये तुम्हाला व्याजातून 1,53,800 रुपये उत्पन्न मिळेल. SBI मुदत ठेवींवरील व्याज तिमाही आधारावर चक्रवाढ होते.


ज्येष्ठ नागरिक असल्यास...


तुम्ही ज्येष्ठ नागरिक असल्यास, FD व्याज दर वार्षिक 6.20 टक्के असेल. अशा परिस्थितीत, जर तुम्ही 5 लाख रुपये जमा केले, तर मॅच्युरिटीवर तुम्हाला 6,80,093 रुपये मिळतील. यामध्ये व्याजाद्वारे 1,80,093 रुपये उत्पन्न मिळेल. SBI त्यांच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीच्या FD साठी SBI Wecare ठेव योजना चालवत आहे. 


यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या 0.50 टक्के अतिरिक्त व्याजाच्या व्यतिरिक्त 0.30 टक्के अधिक व्याज उपलब्ध आहे. म्हणजेच, जर तुम्ही 5 वर्षांसाठी FD केली असेल तर तुम्हाला 6.2 टक्के वार्षिक व्याज मिळेल. तथापि हे जाणून घ्या की, SBI WeCare ठेव योजनेचा लाभ केवळ 31 मार्च 2022 पर्यंतच मिळू शकतो.