नवी दिल्ली : तुमचं एसबीआय (SBI) बँकेत अकाऊंट आहे? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.


SBI ने सुरु केली नवी सेवा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)ने आपल्या ग्राहकांसाठी नवी सेवा सुरु केली आहे. जर तुमच्याकडे बँकेचं डेबिट कार्ड आहे पण त्याच्यावर तुमचा फोटो नाहीये आणि त्यावर फोटो हवा असेल तर त्यासाठी ही नवी सेवा उपयोगी ठरणार आहे.


SBI ने २५७ ब्राँचमध्ये सुरु केली सुविधा 


डेबिट कार्डवर फोटो लावण्यासाठी तुम्हाला एसबीआयच्या ब्राँचमध्ये जावं लागेल आणि त्या ठिकाणी तुम्ही अवघ्या काही मिनिटांत फोटो असलेलं डेबिट कार्ड प्राप्त करु शकता. या सुविधेसाठी तुम्हाला ठराविक ब्राँचमध्येच तुम्हाला जावं लागणार आहे. यासाठी बँकेने २५७ ब्राँचला फिजिटल (Phygital) केलं आहे.


१४३ जिल्ह्यातील ब्राँचेसमध्ये मिळणार सुविधा


बँकेच्या या शाखा आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहेत. या ठिकाणी आठवडे किंवा महिन्याभरात होणारं काम अवघ्या काही मिनिटांत होणार आहे. जर तुम्हालाही फोटो असलेलं डेबिट कार्ड हवं असेल तर त्यासाठी sbiINTOUCH ब्राँचमध्ये अकाऊंट सुरु करावं लागणार आहे. यासाठी बँकेने देशभरातील १४३ जिल्ह्यातील २५७ ब्राँचेसला फिजिटल (Phygital) केलं आहे.


इतरही होणार कामं


इतकचं नाही तर ब्राँचमध्ये तुम्ही बँकिंग सेवेसोबतच SBIच्या सहयोगी कंपन्या म्हणजेच लाईफ इन्श्युरन्स, जनरल इन्श्युरन्स, म्युच्युअल फंड, क्रेडिट कार्ड आणि एसबीआय कॅप सिक्युरिटीज संबंधित ऑनलाईन ट्रेडिंगची काम करु शकणार आहात. ज्या ब्राँचमध्ये ही काम केली जाणार आहेत त्या ब्राँचला बँकेने sbiINTOUCH नाव दिलं. आहे. 


अवघ्या काही मिनिटांत होणार काम


sbiINTOUCH ब्राँचमध्ये सेव्हिंग अकाऊंट, करंट अकाऊंट, पीपीएफ अकाऊंट हे अगदी सहजपणे सुरु करता येणार आहे. अकाऊंट ओपनिंग कियोस्क (AOK)च्या माध्यमातून ही सर्व कामं अवघ्या काही स्टेप्समध्ये केली जाऊ शकतात. यासोबतच डेबिट कार्ड प्रिंटिंग कियोस्कच्या माध्यमातून तुम्ही फोटो असलेलं डेबिट कार्ड अवघ्या १५ मिनिटांत प्राप्त करु शकाल.


पाहा कुठल्या जिल्ह्यात आहेत या ब्राँच


एसबीआयची सुविधा असलेल्या या ब्राँच कुठल्या जिल्ह्यात आणि कुठल्या ठिकाणी आहेत याची सविस्तर माहिती तुम्हाला SBIच्या अधिकृत वेबसाईटवर मिळणार आहे.