मुंबई : बॅंक अकाऊंटमधून अचानक पैसे गायब झाल्यावर आपला गोंधळ उडतो. आपला पासवर्ड कोणाला दिसला का ? बॅंक डिटेल्स चोरीला गेले का ? असे एक ना अनेक प्रश्न आपल्याला पडतात. एटीएममधून कॅश काढत असताना धोका होण्याचे चान्स अधिक असतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामूळे एक छोटीशी चूकदेखील तुम्हाला भारी पडू शकते. यातून वाचण्यासाठी काय करायला हवे याची माहिती असणे गरजेचे आहे. 'स्टेट बॅंक ऑफ इंडिया'ने आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी काही सुचना दिल्या आहेत. 


गर्दीपासून दूर रहा :


एटीएममधून पैसे काढताना तिथे जास्त गर्दी असेल तर ट्रांझाक्शन करणे शक्यतो टाळा. 


कोणत डिव्हाइस आहे का ? 


चारही बाजूला निरीक्षण करा. संशयास्पद यंत्र दिसले तर निदर्शनास आणून द्या. 


एटीएममध्ये पैसे नसतील 


एटीएममध्ये रक्कम नसेल तर कोणते ट्रान्झाक्शन करू नका.  जरी तुम्हाला पैसे काढायचे नसतील तरीही बॅलेंस चेक करणे, पैसे ट्रांसफर करणे, क्रेडीट कार्डचे पेमेंट करणे असे ट्रान्झाक्शन करु नका. 


ट्रान्झाक्शन नंतर हे करा :


 ट्रान्झाक्शन झाल्यानंतर काही सेकंद एटीएम रुममध्ये थांबा. निघताना कॅन्सल बटण नक्की दाबा. तसे केल्यानंतरच बाहेर जा. 


 ज्या एटीएममध्ये गार्ड असेल :


 ज्या एटीएममध्ये सुरक्षएसाठी गार्ड असेल त्यातच जाण्याचा प्रयत्न करा. तिथे तुम्हाला सुरक्षित ट्रान्झाक्शन मिळण्याची शक्यता जास्त असते.


एटीएम बूथ मध्ये कोणी नसेल :


एटीएममध्ये ट्रान्झाक्शन करण्याआधी आजूबाजूला कोणी नाहीए याची खात्री करा. जर कोणी असेल तर त्याला बाहेर जाण्यास सांगा. बॅंकेशी संबधित काही करत असेल तर ते पूर्ण होईपर्यंत वाट पाहा.